एक्स्प्लोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'

Teen Adkun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali New Marathi Movie Teen Adkun Sitaram : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी  सिनेमाचं नाव 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या 'तीन अडकून सीताराम' या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर शेअर करत तिने खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"हे तीन जण तर मजबूत अडकलेत आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायत कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच... 'तीन अडकून सीताराम' 29 सप्टेंबरपासून फक्त चित्रपटगृहात". अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा, चला लंडनमधील शूट अखेर प्रेक्षकांसमोर येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

'तीन अडकून सीताराम' कधी प्रदर्शित होणार? (Teen Adkun Sitaram Release Date)

प्राजक्ता माळीचा बहुचर्चित 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा येत्या 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तीन अडकून सीताराम' हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ प्रेक्षकांना हा सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. हटके नाव आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

'तीन अडकून सीताराम' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांनी सांभाळली आहे. हृषिकेश जोशी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'दुनिया गेली तेल लावत' अशी हटके टॅगलाईन असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'तीन अडकून सीताराम' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या सिनेमातही प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. 

संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा असा विनोदी सिनेमा म्हणजे 'तीन अडकून सीताराम' : हृषिकेश जोशी

'तीन अडकून सीताराम' या सिनेमाबद्दल बोलतना हृषिकेश जोशी म्हणाले,"संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा, असा 'तीन अडकून सीताराम' हा विनोदी सिनेमा आहे. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल. एकंदरीतच सिनेमाची संपूर्ण टीम भारी आहे. हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच". 

संबंधित बातम्या

Prajakta Mali: निसर्गाच्या सानिध्यात रमली प्राजक्ता माळी; शेअर केले कर्जतच्या फार्म हाऊसचे खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराजRanajagjitsinha Patil Nagpur : तुळजापूर प्रकरणात नेमकं काय घडलं, राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले...Suresh Dhas PC FULL : जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा - सुरेश धसDevendra Fadnavis Full  : Beed मध्ये काय घडलं, Parbhani राड्याचं काय झालं, सभागृहात सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Jitendra Awhad : बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
Embed widget