Dunki : 'पठाण', 'जवान'नंतर किंग शाहरुखचा 'डंकी' आता डंका वाजवण्यास सज्ज! पण 'डंकी' म्हणजे काय रे भाऊ?
Dunki Movie : शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण 'डंकी' या शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Shah Rukh Khan Dunki Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज किंग खानच्या वाढदिवशी या सिनेमाचा (Dunki Teaser Release) टीझर रिलीज करण्यात आला आहे. पण या सिनेमाची घोषणा झाल्यापासून 'डंकी' या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
'डंकी'चा अर्थ काय? (Dunki Word Meaning)
शाहरुखच्या सिनेमाचं टायटल 'डंकी' असं आहे. या सिनेमाचं नाव ऐकल्यानंतर शाहरुखदेखील हैराण झाला होता. प्रेक्षकांप्रमाणे शाहरुखलाही प्रश्न पडला होता की, डंकी म्हणजे गाढवच का? पण खरंतर 'डाँकी' (Donky) असे या सिनेमाचं नाव नसून 'डंकी' (Dunki) असं आहे. 'डंकी' हा सिनेमा गाढवावर आधारित नसून डंकी फ्लाईटवर आधारित आहे. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासी जेव्हा अनधिकृतरित्या जातात तेव्हा त्याला 'डंकी फ्लाइट' असे म्हटले जाते. भारतीय लोक अमेरिकेतून कॅनडाला जाण्यासाठी या 'डंकी फ्लाइट'चा अवलंब करतात.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा 'डंकी' हा सिनेमा नाट्यमय आहे. एका पंजाबी मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. पंजाबी मुलगा पंजाबला जाण्यासाठी 'डंकी फ्लाइट'ने जातो. या प्रवासादरम्यान त्याला अनेक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो.
'हे' वर्ष शाहरुखचंच...
शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून त्याने जोरदार कमबॅक केलं. शाहरुखच्या चाहत्यांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत 'पठाण'चाही रेकॉर्ड मोडला. आता त्याचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एकंदरीतच 2023 या वर्षात किंग खानच्या तीन सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
'डंकी'बद्दल जाणून घ्या... (Dunki Movie Details)
'डंकी' या सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जियो स्टुडीओच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. तर दीया मिर्जा, बोमन ईरानी, धर्मेंद्र, सतीश शाह, परीक्षित साहनी, विकी कौशल, काजोल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'डंकी' हा सिनेमा नाताळात 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Dunki Teaser Out : शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; 'डंकी'चा धमाकेदार टीझर आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
