Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 58 वा वाढदिवस! चाहत्यांचा जल्लोष ते जंगी बर्थडे सेलिब्रेशन; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानचा आज वाढदिवस असून चाहते यंदाचा बर्थडे त्याच्यासाठी खूपच खास आहे.
LIVE

Background
Shah Rukh Khan : 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' ते 'बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती हैं'; शाहरुखच्या या डायलॉग्सनं जिंकली प्रेक्षकांची मनं
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊयात शाहरुखच्या प्रसिद्ध डायलॉग्सबद्दल...
Shah Rukh Khan : शाहरुखचा यंदाचा वाढदिवस खास
Shah Rukh Khan : शाहरुखसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे. त्याचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, जवान आणि पठाणच्या यशाचं सेलिब्रेशन शाहरुख खान आज करणार आहे. शाहरुखच्या ग्रँड बर्थडे पार्टीत करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, राजकुमार हिरानी, एटली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. तसेच भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) उपस्थित असेल.
Dunki Teaser Out : शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; 'डंकी'चा टीझर आऊट
Shah Rukh Khan Dunki Teaser Out : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी (Shah Rukh Khan) चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे. अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'डंकी'चा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
Shah Rukh Khan Tweet : शाहरुखने ट्वीट करत मानले चाहत्यांचे आभार
Shah Rukh Khan Tweet : शाहरुख खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे त्याने ट्वीट करत या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्वीट केलं आहे की,"तुमच्यापैकी अनेक मंडळी दरवर्षी रात्री उशिरा येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. तुमचं मनोरंजन करताना मला खूप आनंद मिळतो. खरंतर तुमच्या या प्रेमाच्या स्वप्नात मी जगतो. मला तुमचं मनोरंजन करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आभार. सकाळी भेटू ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन". शाहरुखच्या या ट्वीटनंतर आता त्याच्या आगामी 'डंकी' (Dunky) या सिनेमाचा टीझर येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
It’s unbelievable that so many of u come & wish me late at night. I am but a mere actor. Nothing makes me happier, than, the fact that I can entertain u a bit. I live in a dream of your love. Thank u for allowing me to entertain you all. C u in the morning…on the screen & off it
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2023
Shah Rukh Khan : शाहरुखचा वाढदिवस अन् चाहत्यांचा जल्लोष, मन्नबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, फटाक्यांची आतषबाजी; किंग खानचं मध्यरात्री ट्वीट
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. शाहरुख आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या मन्नत (Mannat) बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. अभिनेत्याने (SRK) या सर्व चाहत्यांचे आभार मानले. मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी जास्त गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
