Raveena Tandan: राजकारणात 'हे' कधीच जमलं नसतं, रविना टंडनचा व्हिडिओ होतोय व्हायरल, म्हणाली 'Politics मध्ये आले तर हत्या..'
तिच्या प्रामाणिक पणाच्या सवयीमुळे आणि चुकीच्या गोष्टी सहन होत नसल्यानं राजकारणात राहणं आव्हानात्मक झालं असतं. असं ती म्हणते.

Raveena Tandan: आपल्या स्पष्टवक्तेपणानं बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी रविना टंडनचा सध्या एक जूना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात रविनाला राजकारणाची ऑफर आली होती पण ती या जगात का येऊ शकली नाही याचं कारण सांगताना दिसतेय. अक्षय कुमार आणि रविना टंडन या दोघांना बॉलिवूडमधलं सजग जोडपं म्हणून ओळखलं जातं.आपल्या स्पष्ट बोलण्यामुळं आणि आपला स्टँड भीड न बाळगता चाहत्यांना सांगायला रवीना ओळखली जाते.तिच्या प्रामाणिक पणाच्या सवयीमुळे आणि चुकीच्या गोष्टी सहन होत नसल्यानं राजकारणात राहणं आव्हानात्मक झालं असतं. असं ती म्हणते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रवीना म्हणतेय की ज्या दिवशी मी राजकारणात प्रवेश करेन तेव्हा माझ्या अशा वागणुकीमुळे कोणीतरी मला गोळ्या घालेल.
काय म्हणतेय रविना या व्हिडिओत?
रविनाचा एक जूना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. यात ती मी जर राजकारणात आले तर मला कोणीतरी गोळी मारेल. कारण मी खोट्याला खऱ्यात बदलू शकत नाही. मला एक गोष्ट फार अवघड गेली असती की जेव्हा मला एखादी गोष्ट पटत नाही किंवा करायची नसते तेंव्हा ते लगेच माझ्या चेहऱ्यावर येतं. मी लगेच त्या गोष्टीवर भांडायला लागते. आजकालच्या जमान्यात खरेपणा ही पॉलिसी नाही. त्यामुळं जो कोणी मला राजकारणात यायला सांगतं त्याला मी सांगते की मी तिथे आले तर माझी एवढ्या लवकर हत्या होईल की सगळंच अवघड होईल.
या चित्रपटात झळकली होती रविना
रवीना टंडनने 1991 मध्ये "पत्थर के फूल" या हिट चित्रपटाद्वारे पदार्पण केले. ती "मोहरा", "दिलवाले", "आतिश" आणि "लाडला" सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते.त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी होते.ती शेवटची ‘पटना शुक्ला’ मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. संजय दत्तसोबत ‘घुडछडी’ या चित्रपटातही ती झळकली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
