एक्स्प्लोर

Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल

अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीडमधील वाल्मिक कराडची दहशत आणि मंत्री धनंजय मुंडेंचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत संबंध, तसेच आर्थिक संबंधाचे पुरावेही त्यांना दिले. तसेच, मी अजित पवारांना जे पुरावे दाखवले ते त्यांनी बारकाईने पाहून घेतले असून ते नक्कीच गंभीर आहेत. त्यामुळे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, आज दुपारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तत्पूर्वी आज कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवार यांना भेटल्या, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री अजित पवार यावर उत्तर देतील आणि त्यांनीच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच,  अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, राखेसंदर्भात थर्मस पावर स्टेशननं केलेला तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचं काम संबंधित स्टेशनचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2006 च्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे, प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा निर्णय येतच नाही, असेही मुंडे म्हणाले.  

आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून होणाऱ्या आरोपावरही धनंजय मुंडेंनी भूमिका मांडली, क्षीरसागर यांना माहिती असेल तर आरोपींचे आणि त्यांचे संबंध आहेत. कृष्णाला काय झालंय हे पोलिसांना माहिती असेल. मागील एक महिन्यापासून बीडच सुरू आहे, माध्यमांचा रुतबा, मान आता कमी होत चालला आहे. काय खरं, काय खोटं हे तपासणी केल्यानंतर माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे, ट्रायल चालली पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी माध्यमांनाही लक्ष्य केलं. तसेच, ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांना फास्टट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे या भूमिकेवरुन माझ्यात कुठलाही बदल नाही, असेही मुंडेंनी पुन्हा म्हटले. 

अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतील

दरम्यान, अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन बीडमधील दहशतीबाबत व वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या जवळीकीसंदर्भात पुरावे दिले. त्यानंतर, अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, जर अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतल नाही, तर मी सरन्यायाधीशांना पत्र लिहून यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं. 

हेही वाचा

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप
Mumbai Hostage Case : रोहित आर्य एकटा नव्हता, संपूर्ण टीमच सामील होती?
Rohit Arya Encounter: 'हे फेक एन्काउंटर, पोलिसांवर गुन्हा दाखल करा', अॅड. नितीन सातपुतेंची मागणी
Vande Mataram Row : मुस्लिमांना वंदे मातरम म्हणायला लावणे चूक - आझमी
Shivbhojan Thali : शिवभोजन चालकांवर उपासमारीची वेळ, २०० कोटी थकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
Bacchu Kadu Brothers : कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
Embed widget