ABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू...मंदिरात येणाऱ्या भाविकांनी अंगभर कपडे घालावे, मंदिर न्यासाकडून पत्रक प्रसिद्ध
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर, पालिका निवडणुकीसंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला....
राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच उत्तर देतील, धनंजय मुंडेचं स्पष्टीकरण.. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांशीही चर्चा
फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्कील , संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे अंगुलीनिर्देश करत आरोप, तर क्षीरसागर यांचेच आंधळेंशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा पलटवार
दिवसभरात धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करु, दमानियांचा इशारा, अजित पवारांपेक्षा फडणवीसच मुंडेंचे पाठीराखे असल्याचा दमानियांना संशय
महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, इंदापूर, दौंड, बारामतीतील शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी, सुषमा अंधारेंनी फोडली वाचा, तर नाराजी आजच दूर करणार, सुप्रिया सुळेंचं एबीपी माझावर आश्वासन
सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबात सात बड्या बिल्डरांचा उल्लेख, सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरुन चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख.. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल
बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख, ज्ञानेश्वरनगर पुनर्विकासासाठी परबांनीे रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती
कंबोज आणि परबांनी फेटाळले आरोप.. आरोपपत्रातील उल्लेख हा प्रक्रियेचा भाग, अनिल परबांचं स्पष्टीकरण, तर झीशानचा जबाब मोडून तोडून वापरला जात असल्याचा कंबोज यांचा खुलासा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय जरांगेना भेटण्यासाठी सराटीत, देशमुखांच्या आई आणि मुलीच्या आग्रहावरून पिलं पाणी