Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Anil parab राजूल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. राजूल पटेल यांची शाखा क्रमांक 61 खाली करावी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आला आहे.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या अगोदरच मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. वर्सोवा येथील शिवसेनेच्या महिला नेत्या व माजी नगरसेवक राजूल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना जे गद्दार जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत, आम्ही मुंबई व महाराष्ट्रासाठी लढत आहोत, असे म्हटले होते. आता, ठाकरेंचे शिवसैनिकही या पक्षप्रवेशानंतर संतप्त झाले असून वर्सोव्यातील शिवसेनेची शाखा ताब्यात घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली, असे आमदार अनिल परब (Anil parab) यांनी म्हटले. अनिल परब यांनी संतप्तपणे आपल्या शिवसेनेती जुन्या आठवणी सांगत त्याचा शाखेचा इतिहासच उजागर केला.
राजूल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. राजूल पटेल यांची शाखा क्रमांक 61 खाली करावी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आला आहे. 24 तासाच्या आत ही शाखा खाली करावी अन्यथा शाखा ताब्यात घेऊ, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. राजुल पटेल या शाखेमध्ये काम करत होत्या ती शाखा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ती शाखा तातडीने खाली करावी असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. तर, उद्धव ठाकरेंचे खास व माजी मंत्री अनिल परब यांनी थेट इशारा देत ती शाखा आम्ही ताब्यात घेणार असल्याचं म्हटलं आहे.
ती शाखा आम्ही ताब्यात घेणार, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. कोर्टात जाऊन ती शाखा आम्ही ताब्यात घेतली होती. फक्त नगरसेविका राजूल पटेल होत्या म्हणून त्यांना ती शाखा दिली होती. या शाखेची कागदपत्रे त्यांच्या नावावर होती, आता ती आम्ही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना सांगितलं आहे, अशा शब्दात वर्सोव्यातील शिवसेना शाखा 61 बाबत अनिल परब यांनी जुन्या आठवणी व शिवसेनेचा इतिहास सांगितला.
तेव्हा निवडणुका होतील
सर्वोच्च न्यायालय जेंव्हा सरकारला वाटेल निवडणुका घ्यायचं तेंव्हा निर्णय देईल. सत्ताधारी अभ्यास करत आहेत, जेंव्हा अभ्यास पूर्ण होईल तेंव्हा निवडणुका घेतील. पण, आम्हाला फक्त निवडणुकांना समोर जायचं आहे, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याबाबतही परब यांनी भाष्य केलं.
हेही वाचा
अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report






















