इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये, वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणात व मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि एका पोलीस अधिकारी यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाल्याचा ऑडिओ समोर आला होता. त्यानंतर, संबंधित पोलीस अधिकाऱ्याने समोर येऊन भूमिका मांडली, हा माझा आवाज नसून कुणीतरी एआयच्या माध्यमातून हे बनवलं असल्याचं म्हटलं होतं. आता, वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल (Viral) झाली आहे. त्यामध्ये, सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी वाल्मिक कराडचा संवाद असल्याचे ऐकायला मिळत आहे. एका कार्यकर्त्याचा विषय सोडून देण्यासाठी, वाल्मिक कराडने हा फोन केल्याचं संभाषणावरुन दिसून येत आहे. आता, ही क्लीप व्हायरल होत असून कार्यकर्त्यांना उद्देशून वाल्मिक, लई मनावर घ्यायचं नाही इथे बाप बसलेले आहेत आपण, असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.
व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये, वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण आहे. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झालीय. या संभाषणात किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून.. असं वाल्मिक कराड म्हणताना ऐकू येतंय. तसेच, संबंधित कार्यकर्त्याशी बोलताना इथं बाप बसलेले आहेत आपण.. असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये झाला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची पृष्टी केली जात नाही. दरम्यान, या व्हायरल क्लीपमुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, पोलिसांना फोन करुन हवं तसं करायला लावणे किंवा आपण बाप आहेत असं म्हणत दहशत निर्माण करण्याचं काम जिल्ह्यात केलं जात असल्याचं या ऑडिओ क्लीपवरुन दिसून येत आहे.
वाल्मिक कराड तुरुंगात
दरम्यान, वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्यांतर्गत एसआायटीच्या कोठडीत असून गेल्याच आठवड्यात आजारी असल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज देत पुन्हा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, तो अद्यापही फरार असल्याने घातपाताची शंका उपस्थित केली जात आहे.
ऑडिओ क्लीपमधील संभाषण
कार्यकर्ता- अण्णा, नाशिकवरुन बोलतोय
परत फोन यायला लागलेत पोलीस स्टेशनवरुन
अण्णा ऐका ना, पीएसआय कुलथे सायबर
नंबर सांगितला
वाल्मिक कराड - चला ठेवा
वाल्मिक - निशिगंधा खुळे, ताई वाल्मिक कराड बोलतोय
ती पोरं चिल्लर आहेत बरं
ते काय करणार आहेत तिकडे
कुलथे - पोस्ट डिलिट करुन टाका केलं की झालं
वाल्मिक - भय्या पोस्ट डिलिट करुन टाका
कुलथे - वातावरण खराब होतं
वाल्मिक - त्यांनी विषय सुरू केला,
वाल्मिक कार्यकर्त्यांना उद्देशून - इग्नोर करायचं भाई, मनावर घ्यायचं नाही इथे बाप बसलेले आहेत आपण,
कार्यकर्ते - तुम्ही आहेत म्हणूनच दम धरलाय
हेही वाचा
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा