एक्स्प्लोर
माजी मिस इंडिया नताशा सुरी अपघातात गंभीर जखमी
बंजी जम्पिंग करताना नताशाने डोंगरकड्यावरुन झेप घेतली, मात्र दुर्दैवाने संरक्षक दोर मध्येच तुटला आणि डोकं पालथ्या अवस्थेत ती तलावात कोसळली.

मुंबई : माजी फेमिना मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा सुरी हिला इंडोनेशियात मोठा अपघात झाला. नताशा अपघातात गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात ती 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
नताशा इंडोनेशियामध्ये एका लक्झुरिअर ब्रँड स्टोअरच्या लाँच इव्हेंटसाठी गेली होती. साहसी खेळांची आवड असलेल्या नताशाने बंजी जम्पिंगचा थरारक अनुभव घेण्याचं ठरवलं. एका तलावावर बंजी जम्पिंग करताना तिने डोंगरकड्यावरुन झेप घेतली. मात्र दुर्दैवाने तिला बांधलेला संरक्षक दोर मध्येच तुटला आणि डोकं पालथ्या अवस्थेत ती जलाशयात कोसळली.
अपघातात नताशा जखमी झाली असून रुग्णालयात तिच्यावर 24 तास डॉक्टरांची निगराणी आहे.
2006 मध्ये नताशाने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम 10 स्पर्धकांमध्येही तिचा समावेश होता. 2016 मध्ये तिने 'किंग लायर' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं.
याशिवाय तिने बिग स्वीच, सुपर डूड, सेल गुरु, स्टाईल पोलिस यासारख्या ढीगभर कार्यक्रमांचं अँकरिंग केलं आहे. 'इन्साईड एज' या वेब सीरिजमध्ये नताशा नुकतीच झळकली होती. आगामी 'बा बा ब्लॅक शीप' चित्रपटात ती अनुपम खेर, मनिष पॉल, मंजिरी फडणीस, अन्नू कपूर, के के मेनन सारख्या दिग्गजांसोबत झळकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
