Films Release On Diwali : दिवाळीत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; 7 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
Movie : दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
Films Release On Diwali : देशभरात 24 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठीदेखील दिवाळीचा सण खूप खास आहे. दरवर्षी दिवाळीला फक्त एक किंवा दोन सिनेमे (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण आता सात सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात हिंदीसह दाक्षिणात्य सिनेमांचादेखील सहभाग आहे.
थॅंक गॉड
अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड' हा विनोदी सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अजयसोबत या सिनेमात रकुल प्रीत सिंहदेखील दिसणार आहे. 25 ऑक्टोबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
राम सेतु
दिवाळीत अक्षय कुमार आणि अजय देवगनची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. 25 ऑक्टोबरला अजयचा 'राम सेतू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह नुसरत भरुचा आणि जॅकलीन फर्नांडीस महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
प्रिन्स
हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीदेखील बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात 'प्रिन्स' या सिनेमाचादेखील समावेश आहे. हा सिनेमा 31 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
सरदार
रोमान्स आणि विनोदाव्यतिरिक्त अॅक्शनचा तडका असणारा 'सरदार' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तीचा हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धमाका करणार आहे. हिंदीसह हा सिनेमा साऊथमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे.
गिन्ना
'गिन्ना' हा भयपट दिवाळीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या सिनेमात विष्णु मांचू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर 'उरी देवुदा' या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.
हर हर महादेव
'हर हर महादेव' हा सिनेमा येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिजीत देशपांडे यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
उरी देवुदा
'उरी देवुदा' हा तेलुगू सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विश्वक सेन आणि मिथिला पाल्कर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या