एक्स्प्लोर
Sharmila Tagore Bikini Poster: अख्ख्या मुंबईत लावलेले अभिनेत्रीचे बिकनीतले पोस्टर्स; पण अचानक होणारी सासू भेटायला निघाली अन्...
Actress Bikini Poster Removed In One Night: सध्या बॉलिवूडमध्ये बिकनी फोटोशूट एक सामान्य गोष्ट आहे. पण, 60 च्या दशकात असं नव्हतं. त्यावेळी असं फोटोशूट म्हणजे, सगळीकडे खळबळ, चर्चा आणि टीका...

Actress Bikini Poster Removed In One Night
1/9

तीच खळबळ अख्ख्या सिनेइंडस्ट्रीत पसरवलेली एका गुणी अभिनेत्रीनं, जिचं नाव होतं शर्मिला टागोर.
2/9

शर्मिला टागोर म्हणजे, बॉलिवूड स्टार सैफ अली खानची आई आणि अभिनेत्री करिना कपूरची सासू... शर्मिला टागोर यांनी अख्खी सिनेइंडस्ट्री आपल्या अदांनी आणि अभिनयानं गाजवली होती. पण, त्याच्या आयुष्यात एक किस्सा घडलेला, तो म्हणजे, त्यांच्या बिकनी फोटोशूटचा.
3/9

(टीप वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
4/9

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा बिकिनी फोटोशूट केलं होतं. 1966 मध्ये फिल्मफेअर मॅगझिनसाठी एक फोटोशूट केलं होतं, ज्यामुळे खूप वाद झाला होता.
5/9

एका मासिकासाठी फोटोशूट केल्यानंतर शर्मिला टागोर यांनी 1967 मध्ये आलेल्या 'ॲन इव्हनिंग इन पॅरिस' चित्रपटात स्विमसूट वेअर केला होता. त्यानंतर 'आमने-सामने' चित्रपटातही त्या मोनोकिनीमध्ये दिसल्या होत्या.
6/9

अशा परिस्थितीत लोकांनी तिला खूप विरोध केला आणि अनेक ठिकाणी तिच्या स्विमसूटचे पोस्टर रस्त्यावर लावण्यात आले. खरंतर शर्मिला यांचे विचार त्या काळातही खूप वेगळ्या धाटणीचे होते. त्यांना सगळ्याचा त्रास होत नव्हता. पण नंतर असं काही घडलं की, त्यांच्यासाठी अख्ख्या मुंबईत झळकलेले त्यांचे पोस्टर्स त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले होते.
7/9

शर्मिला टागोर यांचं त्यावेळी क्रिकेटर टायगर पतौदी यांच्यासोबत प्रेमाचं सूत जुळलं होतं. टायगर पतौदी यांनी त्यांच्या आईला शर्मिला टागौर यांच्याबाबत सांगितलं. खरं तर हे ऐकून त्यांची आई आनंदी झाली. त्यांनी तात्काळ शर्मिला यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
8/9

मुंबई शहरात सर्वत्र बिकिनीमध्ये शर्मिलाचे पोस्टर्स लागले होते आणि त्याच दरम्यान शर्मिला यांना बातमी मिळाली की, त्यांच्या होणाऱ्या सासुबाई त्यांना भेटायला येत आहे. पुढे काय करायचं या विचारानं अभिनेत्री खूप घाबरली.
9/9

त्यानंतर दुसऱ्या दिवशी टायगर पतौदीची आई मुंबईत आली आणि शर्मिला यांची भेट घेतली. त्यांना त्यांची होणारी सून खूपच आवडली आणि त्यानंतर शर्मिला टागोर पतौदी घराण्याची सून झाल्या.
Published at : 02 Dec 2024 07:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
