एक्स्प्लोर

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Har Har Mahadeo Song : 'हर हर महादेव' या चित्रपटातील गाणीही रोमहर्षक अनुभव देणारी आहेत. यामधील 'बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Har Har Mahadeo Song : झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत. नुकतंच या चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रदर्शित झालं आहे. 

हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर जितका दमदार आहे. तितकीच या चित्रपटातील गाणीही रोमहर्षक अनुभव देणारी आहेत. यामधील 'बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे. मंदार चोळकर हे या गाण्याचे गीतकार आहेत. तर, हितेश मोडक यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर, आपल्या बुलंद आवाजाने मनिष राजगिरे यांनी गाणं गायलं आहे. यातील 'वाह रे शिवा' हे गाण्याचा यापूर्वीच विविध म्युझीकल ऍप्सवर चार्टबस्टर लिस्टमध्ये समावेश झाला आहे. युट्युबवरही हे गाणं लाखो प्रेक्षकांनी बघितले असून त्याला आपल्या पसंतीची पावती देत भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

'बाजी रं बाजी रं' हे गाणं सळसळतं आणि नवी ऊर्जा निर्माण करणारं आहे. या गाण्यातील ओळीसुद्धा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.

छाताडाचा कोट करून रणी उभा
संहाराचा रंग चढे दाही दिशा 
बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं
बाजी रं बाजी रं अंगार बाजी रं 

अशा जबरदस्त शब्दांत गीतकार मंदार चोळकर यांनी बाजीप्रभूंचं वर्णन यात केलं आहे.

शरद केळकरने साकारली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका

अभिनेते शरद केळकर हे या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून हे गाणं त्यांच्यावरच चित्रीत झालं आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

Har Har Mahadev: 'ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट'; 'हर हर महादेव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Ashok Saraf Lamborgini Car Video Viral: अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
Tiger Shroff Juhu Attack: 'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती
'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती
Ramayana Sai Pallavi Comment On Ravana: 'रावण पूर्णपणे वाईट नव्हताच...'; साई पल्लवीचं जाहीर वक्तव्य, नेटकरी विचारतायत, 'अगं किडनॅपरचं कौतुक कसं करू शकतेस?'
'रावण पूर्णपणे वाईट नव्हताच...'; साई पल्लवीचं जाहीर वक्तव्य, नेटकरी विचारतायत, 'अगं किडनॅपरचं कौतुक कसं करू शकतेस?'

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
Devendra Fadnavis and Rohit Pawar: तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
Embed widget