एक्स्प्लोर

महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 जागांवर महायुतीने यश मिळविले आहे. निकालानंतर सर्व 11 आमदार मुंबईला रवाना झाले आहेत.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Maharashtra vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सर्व 11 जागांवर महायुतीने यश मिळविले आहे. निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 आमदार मुंबईला रवाना झाले असून, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. नव्या शासनात जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना नव्या सरकारमध्ये पुन्हा संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे अशा एकूण सात जणांची नावे चर्चेत आहेत. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे हेही स्पर्धेत आहेत, ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यातच लेवा पाटील समाजाचे असल्याने भाजपकडून त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. पाचोऱ्याचे किशोर पाटील हेही तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर किशोर पाटील हे सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. 

जळगाव जिल्ह्यातून नेमकी कुणाला संधी? 

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपमधील नवीन नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. अमित शाह यांच्या चाळीसगावमधील सभेत नव्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना स्थान असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यातच चव्हाण हे फडणवीस व महाजन यांचेही निकटवर्तीय मानले जातात. भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जळगावचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही मंत्रि‍पदाच्या स्पर्धेत आहे. आता जळगाव जिल्ह्यातून नेमकी कुणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी 

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ : सुरेश भोळे विजयी

सुरेश भोळे भाजप, 
जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गट, 
कुलभूषण पाटील अपक्ष,
डॉ. अनुज पाटील मनसे

जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन विजयी

गिरीश महाजन, भाजप 
दिलीप खोडपे

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : गुलाबराव पाटील विजयी 

गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट, 
गुलाबराव देवकर 

अमळनेर विधानसभा मतदारसंघ : अनिल पाटील विजयी

अनिल पाटील 
शिरीष चौधरी अपक्ष

पाचोरा विधानसभा मतदारसंघ : किशोर पाटील विजयी 

किशोर पाटील, महायुती
वैशाली सूर्यवंशी, ठाकरे गट  
दिलीप वाघ, अमोल शिंदे अपक्ष

एरंडोल विधानसभा मतदारसंघ : अमोल पाटील विजयी

अमोल चिमणराव पाटील शिवसेना 
सतीश पाटील, शरद पवार गट

चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनावणे विजयी

चंद्रकांत सोनवणे शिवसेना 
प्रभाकर सोनवणे शिवसेना ठाकरे गट

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - मंगेश चव्हाण विजयी

मंगेश चव्हाण भाजप 
उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गट

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील विजयी 

चंद्रकांत पाटील, शिवसेना  
रोहिणी खडसे शरद पवार गट 
विनोद सोनवणे अपक्ष

भुसावळ विधानसभा मतदारसंघ : संजय सावकारे विजयी

संजय सावकारे भाजप 
राजेश मानवतकर काँग्रेस 

रावेर विधानसभा मतदारसंघ : अमोल जावळे विजयी

अमोल जावळे भाजप, 
धनंजय चौधरी काँग्रेस 
अनिल चौधरी प्रहार जनशक्ती पक्ष 
शमिभा पाटील वंचित बहुजन आघाडी

आणखी वाचा 

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget