Latur Assembly Election : लातूर जिल्ह्यात 66.91 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? कोण मारणार मैदान?
लातूर जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) 6 मतदारसंघ आहेत. या सहाही मतदारसंघाती चित्र स्पष्ट जालं आहे. कोणाविरुद्ध कोण लढणार याची माहिती मिळाली आहे.
Latur District Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लातूर जिल्ह्यात देखील वेगवान घडामोडी घडत आहे. लातूर जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) 6 मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर अशा दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. शिवाजीराव काळगे (Dr Shivajirao Kalge) यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे (Sudhakar Shrangare) यांचा पराभव केला होता. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 (सध्या अजित पवार गट) आणि भाजपचे 2 आमदार निवडून आले होते. दरम्यान, यावेळी लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात 66.91 टक्के मतदान झाले आहे.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महाविकास आघाडी उमेदवार | महायुती उमेदवार | वंचित/ अपक्ष उमेदवार | विजयी उमेदवार |
1 |
लातूर ग्रामीण |
धीरज देशमुख (काँग्रेस) | रमेश कराड (भाजप) | विनोद खटके (वंचित) | |
2 |
लातूर शहर विधानसभा |
अमित देशमुख (काँग्रेस) | डॉ. अर्चना पाटील चाकूरकर (भाजप) | ||
3 |
अहमदपूर विधानसभा |
विनायकराव पाटील (NCP SP) | बाबासाहेब पाटील (NCP AP) | गणेश हाके (अपक्ष) | |
4 |
उदगीर विधानसभा |
सुधाकर भालेराव (NCP SP) | संजय बनसोडे (NCP AP) | ||
5 |
निलंगा विधानसभा |
अभय साळुंखे (काँग्रेस) | संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) | ||
6 |
औसा विधानसभा |
दिनकर माने (शिवसेना ठाकरे गट) | अभिमन्यू पवार (भाजप) |
लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1) लातूर ग्रामीण विधानसभा
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत ही
भाजपचे रमेश कराड विरुद्ध काँग्रसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यात होत आहे.
2) लातूर शहर विधानसभा
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने तीन मुख्य उमेदवारातच लढत आहे. यामध्ये काँग्रसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर तर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके निवडणूक लढवत आहेत.
3) अहमदपूर विधानसभा
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायकराव पाटील तर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके हे देकील निवडणूक लढवत आहेत.
4) उदगीर विधानसभा
उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे विरुद्ध
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव यांच्यात लढत होत आहे.
5) निलंगा विधानसभा
निलंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे
अभय साळुंखे यांच्यात लढत होत आहे.
6) औसा विधानसभा
औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने निवडणूक लढवत आहेत.
लातूर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. यामध्ये लातूर जिल्ह्यात 66.91 टक्के मतदान झाले आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 69.69 टक्के
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – 62.6 टक्के
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – 68.55 टक्के
उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ - 67.11 टक्के
निलंगा विधानसभा मतदारसंघ - 65.75 टक्के
औसा विधानसभा मतदारसंघ - 68.7 टक्के