(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Result 2022: सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर, पाहा एका क्लिकवर कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
Election Result 202 2: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे. काल रात्री उशीरापर्यंत काही मतदारसंघात मतमोजणी चालू होती. अखेर सर्व मतदारसंघातील मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. पाहुयात कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा....
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश : एकूण जागा : 403
भारतीय जनता पक्ष : 255
समाजवादी पक्ष : 111
अपना दल (सोनेलाल) : 12
राष्ट्रीय लोकदल : 8
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष : 6
निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल : 6
काँग्रेस : 2
जनसत्ता दल लोकशाही : 2
बहुजन समाज पक्ष : 1
पंजाब
एकूण जागा : 117
आम आदमी पार्टी : 92
बहुजन समाज पक्ष : 1
भारतीय जनता पक्ष : 2
अपक्ष : 1
काँग्रेस : 18
शिरोमणी अकाली दल : 3
गोवा
एकूण जागा : 40
भारतीय जनता पक्ष : 20
काँग्रेस : 11
आम आदमी पार्टी : 2
महाराष्ट्र गोमंतक : 2
गोवा फॉरवर्ड पार्टी : 1
क्रांतिकारी गोवा पक्ष : 1
अपक्ष : 3
मणिपूर
एकूण 60 जागा
भारतीय जनता पक्ष : 32
अपक्ष : 3
काँग्रेस : 5
जनता दल (संयुक्त) : 6
कुकी पीपल्स अलायन्स : 2
नागा पीपल्स फ्रंट : 5
राष्ट्रवादी पीपल्स पार्टी : 7
उत्तराखंड
एकूण जागा : 70
भारतीय जनता पक्ष : 47
काँग्रेस : 19
अपक्ष : 2
बहुजन समाज पक्ष : 2
अखेर पाच राज्यांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, भाजपला सर्वधीक जागा मिळाल्या आहे. त्यामुले पाचपैकी चार राज्यात भाजप सरकर स्थापन करणार आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्ता स्थापन करेल.