एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shocking ! मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण, संताप आणणारं कृत्य; व्हिडीओ व्हायरल

Mumbai Police: मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यावर एका वाहनचालकाची चौकशी करत असताना ही घटना घडली आहे.

Mumbai Police News update : मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यावर एका वाहनचालकाची चौकशी करत असताना ही घटना घडली आहे. वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वाहतूक पोलिसाला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच पोलीस हवालदाराला मारहाण होत असताना तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी देखील जमलेली दिसत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक लोक पोलिसाला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

Mumbai Police: नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुर्ला (पश्चिम) डेपो सिग्नल जवळ घडली आहे. खालीद इसाक वसईकर (वय 53) याने स्कूटर चालवत असताना सिग्नल तोडून पळून जात होता. मात्र त्याला वाहतूक हवालदारने पकडले आणि याबाबत चौकशी करत असताना खालीद याने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यावेळी खालीद याने आरडाओरडा करून लोकांची गर्दी जमवली. यातच घटनास्थळी गर्दीतून इतर दोन अनोळखी व्यक्तींनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली आणि एकाने पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावत धमकी दिली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद (Viral Video) झाला असून याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात कलम 353, 332, 504, 506, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune Police : पुण्यातही पोलिसाला मारहाण 

दरम्यान, पुण्यातही काही महिन्यांपूर्वी पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली होती. येथे कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दोन दुचाकीस्वारांनी बंद करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने वाद घालत होते. हा वाद टोकाला गेला आणि दोघांनी महिला पोलिसाच्या तोंडावर फटका मारला. या महिला पोलिसाला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील दोघांनी मारहाण केली. अखेर नागरिक या वादात पडले आणि आरोपी असलेल्या दोघांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाडी झाडाला धडकली आणि नागरिकांनी आरोपी दोघांना पोलिसांच्या हवाली केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaVikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुतेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget