विरारमध्ये महिलांचा दारु पिऊन धिंगाणा, पोलिसांना शिवीगाळ करुन घेतला चावा
विरार : विरारच्या (Virar) पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिप येथील 'पंखा फास्ट'या रेस्टारंट अॅण्ड बार येथे धक्कादायक प्रकार घडलाय.
विरार : विरारच्या (Virar) पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिप येथील 'पंखा फास्ट'या रेस्टारंट अॅण्ड बार येथे धक्कादायक प्रकार घडलाय. 'पंखा फास्ट'या रेस्टारंट अॅण्ड बार येथे तीन महिला आरोपींनी अश्लील शिवीगाळ करून पोलिसांना मारहाण करुन, चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 महिलांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
3 महिलांनी दारू पिऊन धिंगाणा घातला
विरारमध्ये पंखा फास्ट या रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये 3 महिलांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आला. फोन आल्यानंतर महिला पोलीस आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत दमदाटी केली. आरोपी महिलेने (वय 22) हिने महिला पोलिसांच्या गणवेशाला पकडून ओढले आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टाची कॉलर पकडली. तिचा हात सोडवत असताना आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि हाताच्या कोपऱ्याल जोरात चावा घेतला.
सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की
दुसऱ्या आरोपीने पोलिसांचे केस ओढले. पोलीस अंमलदार उत्कर्षा यांना सोडविण्यासाठी आलेल्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकास देखील धक्काबुकी करून तिचा टी-शर्ट फाडला. तिसरी आरोपी असलेल्या महिलेने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली.
महिला आरोपींकडून महिला पोलिसांना मारहाण
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी म्हणाले, आरोपींनी पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यात, खांद्यावर लोखंडी बादलीने मारून दुखापत केली. त्यांच्या डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेऊन दुखापत केली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
OTT Movies : थरार, नाट्य अन् रहस्यमय चित्रपट पाहायला आवडतात? ओटीटीवरचे हे सिनेमे नक्कीच पाहा; हॉलिवूडलाही देतात टक्कर