घाबरले का? अदाणी, अंबानी टेम्पोने पैसे देतात यांचा वैयक्तिक अनुभव, राहुल गांधींचे पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर
Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज (दि.8) तेलंगणामध्ये प्रचारसभा घेतली. या सभेतून पीएम मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केले होते.
Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज (दि.8) तेलंगणामध्ये प्रचारसभा घेतली. या सभेतून पीएम मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केले होते. राहुल गांधी आणि काँग्रेसने अदाणी, अंबानींकडून टेम्पोने पैसे घेतले आहेत, असं पीएम मोदींनी केले होते. दरम्यान, पीएम मोदींच्या आरोपांना राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातून पीएम मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
नमस्कार मोदीजी! थोडेसे घाबरलेत का? सामान्यत: तुम्ही बंद खोलीत अदाणी,अंबानीविषयी भाष्य करतात. तुम्ही पहिल्यांदा सार्वजनिकरित्या अदाणी, अंबाणी विषयी बोलले. तुम्हाला माहिती आहे की, हे टेम्पोने पैसा देत देतात. एक काम करा, सीबीआय आणि ईडीला यांच्याकडे पाठवा. तुम्ही चौकशी करायला सांगा. तुम्ही घाबरु नका. जेवढा पैसा नरेंद्र मोदींनी अदाणी आणि अंबानींना दिला आहे ना? तेवढाच पैसा आम्ही देशातील गरिबांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना, या योजनांच्या माध्यमातून आम्ही लोकांना लखपती बनवणार आहोत. यांनी 22 अब्जाधीश बनवले आहेत. आम्ही करोडो लखपती बनवले आहेत, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
पीएम मोदींनी कोणते आरोप केले होते?
"तुम्ही पाहिले असेल की, काँग्रेसचे राजकुमार मागील 5 वर्षांत सकाळी उठल्यापासून जप सुरु करायचे. राफेलचे प्रकरण ग्राऊंडेड झाले तेव्हापासून त्यांनी नवीन जप सुरु केला. गेल्या पाच वर्षात एकच जप केला. पाच उद्योगपती , पाच उद्योगपती असं म्हणू लागले. त्यानंतर हळूहळू म्हणू लागले की, अंबानी ,अदाणी -अंबानी ,अदाणी...मात्र, जेव्हापासून निवडणूका जाहीर झाल्या तेव्हापासून यांनी अंबानी , अदाणींना शिव्या देणे बंद केले. मी आज तेलंगणातून विचारु इच्छितो की, राजकुमाराने सांगावे की, निवडणुकीसाठी अंबानी ,अदाणीकडून किती माल उचलला आहे? काळ्या पैशाचे किती पोते आणले आहेत? तुमच्याकडे टॅम्पोने पैसे पोहोचले आहेत का? तुमच्यामध्ये कोणता सौदा झाला आहे? तुम्ही रात्रीतून अदाणी , अंबानींना शिव्या देणे बंद केले. काहीतरी काळाबाजार सुरु आहे. तुम्ही टेम्पोभरुन काहीतरी घेतलं आहे. तुम्हाला याचे उत्तर देशाला द्यावे लागेल, असे आरोपी पीएम मोदींनी केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Kolhapur Loksabha : शाहू महाराज वि. संजय मंडलिक, कोल्हापूरच्या हायव्होल्टेज लढतीत कोण बाजी मारणार? माझा अंदाज