Mumbai Crime News : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय वृद्धाकडून 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
Mumbai Crime News : आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचा विनयभंग केला होता, तो घरी एकटा असताना पीडितेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले.

Mumbai Crime News : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील आग्रीपाडा परिसरात घडला आहे, आग्रीपाडा पोलिसांनी एका 70 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे, दरम्यान आरोपी हा निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी असल्याचे समजते.
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी भायखळा येथे एकाच परिसरात राहतात. आरोपी पत्नी, मुलगा आणि मुलाच्या कुटुंबासह राहतो. आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचा विनयभंग केला होता, तो घरी एकटा असताना पीडितेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. ही घटना 6 मे रोजी उघडकीस आली, जेव्हा आरोपीने तिला घरी एकटी असताना पुन्हा फोन करायला सुरुवात केली.
आरोपीकडून कोणालाही न सांगण्याची धमकी
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, पीडिता रडू लागली. तिच्या आईने कारण विचारले असता तिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. आरोपीने तिला चॉकलेट्सही दिली आणि कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, पीडितेने पुढे सांगितले की, आरोपी तिला पुन्हा आपल्या घरी बोलवत आहे. त्यानंतर कुटुंबाने आग्रीपाडा पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला, आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, असे आग्रीपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी सांगितले.
POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी आईचे जबाब नोंदवले तसेच पीडितेचीही पडताळणी केली आणि 376 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला तत्काळ अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तो मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत असल्याचे पाचे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नांदेड जिल्ह्यातील घटनेने खळबळ
Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून
Nashik : नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा! आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
