एक्स्प्लोर

Hampi Sexual Asault Case: गळा दाबला, कपडे काढले...; इस्रायलच्या महिला पर्यटकासह होमस्टेच्या मालकीणवरही अत्याचार; जलायशाजवळ नेमकं काय घडलं?

Hampi Gangrape Case: सदर प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Hampi Gangrape Case: कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पीजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनापूर जलायशाजवळ इस्रायलच्या एका 27 वर्षीय पर्यटकासह दोन महिलांवर बलात्कार (Hampi Gangrape Case) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरी पीडित तरुणी 'होमस्टे' ची मालकीण आहे. पीडितांवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना गुरुवारी रात्री, 6 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नेमकं काय घडलं?

29 वर्षीय होम स्टे ऑपरेटर आणि तीन पुरूष पर्यटक आणि एक इस्त्रायली महिला पर्यटक हे तुंगभद्रा सनापूर जलायशाजवळ आले होते. हे सर्वजण कॅनलजवळ बसले होते आणि गिटार वाजवत गाणं बोलत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने प्रथम पेट्रोलबद्दल विचारले. आम्ही त्यांना जवळपास पेट्रोल पंप नाही असं सांगितल्यानंतर त्यांनी 100 रुपयांची मागणी केली. आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, म्हणून आम्ही पैसे नाहीत, असं सांगितले. मात्र त्यानंतरही आरोपी वारंवार पैशासाठी आग्रह करत असल्याने ओडिशातील एका पुरूष पर्यटकाने त्यांना 20 रुपये दिले. यानंतर, तिघांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिच्या डोक्यावर दगड मारण्याची धमकी दिली. या वादानंतर दोन व्यक्तीने मारहाण करत होमस्टे ऑपरेटर आणि इस्त्रायली महिलेवर बलात्कार केला. तर तिसऱ्या व्यक्तीने एका पुरूष पर्यटकाला कॅनलमध्ये ढकलून दिल्याचं पीडितने तक्रारीत म्हटलं आहे. 

गळा दाबला, कपडे काढले-

दोन आरोपी मिळून मला कॅनेलच्या बाजूला ओढत घेऊन गेले. त्यांच्यापैकी एकाने माझा गळा दाबला आणि माझे कपडे काढले. एक एक करून त्यांनी मला मारहाण केली आणि माझ्यावर बलात्कार केला, असे होमस्टे ऑपरेटरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच अशाच पद्धतीने आरोपींपैकी एकाने इस्त्रायली महिलेला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचंही तिने सांगितलं आहे. दरम्यान, घटनास्थळी एक दुचाकी, कॅमेऱ्याची बॅग, पॉवर बँक, पेन, तुटलेला गिटार, सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. पोलीस अधिक्षक राम अरसिड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहा पथके नेमली गेली आहेत.

संबंधित बातमी:

Pune Crime News: रस्त्यात लघुशंका अन् अश्लिल वर्तन करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्राच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण, गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्टची प्रतिक्षा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Aakrosh Morchaदेशमुख हत्या प्रकरणी बारामतीत आक्रोश मोर्चा,3 महिन्यानंतरही कृष्णा आंधळे फरारSpecial Report Marathi :हॉटेलात मेन्यू कार्ड मराठी करा,ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह, मुंबईकर म्हणतात..IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारत-न्यूझीलंड फायनल,सुनंदन लेले यांचा दुबईतून रिपोर्टMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
VIDEO: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
Embed widget