एक्स्प्लोर

Pune Crime News: रस्त्यात लघुशंका अन् अश्लिल वर्तन करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्राच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण, गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्टची प्रतिक्षा

Pune Crime News: गौरव आहुजा सोबत असलेल्या भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला आहे. भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे.

पुणे: पुण्यातील शास्त्रीरोडवरती रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून रस्त्याच्या कडेला फुटपाथवरती लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं म्हणत गौरव आहुजा माफी मागताना दिसत आहे. गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून तो दारू पीत होता.  गौरव आहुजा सोबत असलेल्या भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला आहे. भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे. 

गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक168/2025, कलम - 270,281,285,79 BNS सह 110/112 म पो कायदा 184,185 मो वा कायदा 85 दारूबंदी कायदा या गुन्ह्यातील आरोपी नाव गौरव मनोज आहुजा, 25 वर्षे, राहणार - एन आयबीएम रोड, कोंढवा, पुणे यास कराड पोलीस स्टेशनच्या ताब्यातून घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुणे येथे आणण्यात आलं आहे. आज दिनांक - 09/03/2025 रोजी 07.50 वाजता अटक करण्यात आलेली आहे.

व्हिडिओमध्ये गौरव आहुजा काय म्हणाला?

"मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी", असं गौरव आहुजा व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

आहुजा बापलेक जुगारात सक्रिय

 पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनोज आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकेसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, जुगाराच्या पैशातुन आहुजा बाप लेकांनी हॉटले व्यवसायात देखील गुंतवणुक केलीय. पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाच क्रीम एंड कीचन या नावाचं हॉटेल देखील आहे. गौरव आहुजाला दारुचे व्यसन तर आहेच, त्याचबरोबर तो आणखी कोणती नशा करतो का? याचाही पोलीस तपास करणार आहेत. येरवडा भागात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा त्याच्या मित्रासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.

नेमकं प्रकरण काय? 

पुण्यात काल (शनिवारी, 9), सकाळच्या वेळेला BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने रस्त्यावरच लघुशंका केली, त्यानंतर एकाने जाब विचारला त्यानंतर त्याने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले होते. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली. या गाडीत बसलेला हा तरुण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने निघून गेले. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट
धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीतून स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
Embed widget