Crime News : 72 वर्षीय वृद्धाचा अश्लिल व्हिडीओ काढून उकळली 15 लाखांची खंडणी; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News : विश्वासात घेतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला दारू पाजून त्याचा अश्लील व्हिडिओ रेकोर्ड करण्यात आला. या व्हिडिओची धमकी देत वृद्धाकडून 15 लाख वसूल करण्यात आले.
Crime News : झटपट पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कोणताही सर्वसामान्य व्यक्ती सामाजिक प्रतिस्था जपत असतो ..कोणाच्या खासगी बाबी किंवा चारित्र्यावर वाईट चर्चा होईल अशी कृती पासून लांब असतो. महिलेसोबत अश्लील व्हिडिओ दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील सुकणी या गावातील 72 वर्षीय व्यक्ती बरोबर घडली आहे. या वयोवृद्ध व्यक्तीकडून तब्बल 15 लाख उकळण्यात आले आहेत.
कसा हेरला सावज?
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील मुसा शेख ,गुलाबसाब शेख आणि महिला साथीदार रुपाली ढगे यांनी एक कट रचला. त्यांनी 72 वर्षीय विठ्ठल मुळे ह्या वयोवृद्ध शेतकऱ्यास सावज बनवले. त्यापूर्वी आरोपींनी त्यांची सर्व माहिती काढली. यामध्ये त्यांची आर्थिक स्थिती, शेती, कौटुंबिक स्थिती आदीबाबीची माहिती काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढविण्यासाठी सतत भेटीगाठी करण्यात आल्या. विश्वासात आल्यावर त्यांना मद्यपान करण्यास आरोपींनी भाग पाडले. त्यानंतर विठ्ठल मुळे हे नशेत असताना रुपाली ढगे या महिले बरोबर त्याचं अश्लील चित्रीकरण करण्यात आले.
खंडणी वसूली
हे अश्लील चित्रीकरण विठ्ठल मुळे यांना दाखविण्यात आले. हे सर्व चित्रीकरण पोलिसांना दाखवून गुन्हा दाखल करण्यात लावतो अशी धमकी दिली. बदनामी आणि पोलिसांचा सेसीमारा मागे लागेल यामुळे मुळे हवालदिल झाले. या प्रकारची वाच्यता होऊ नये यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. आरोपींनी तब्बल 15 लाख रुपये वसूल केले
पैसे घेण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळे ठिकाण
सतत येणारी धमकी आणि बदनामीच्या भीतीने विठ्ठल मुळे पैसे देण्यास तयार झाले. सराईत आरोपींनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वसूल केले. आरोपींनी ये मौजे सुकणी, शिरुर ताजबंद व तळेगाव रोड अहमदपूर या ठिकाणी खंडणीची रक्कम घेतली.
बदनामी झाली तरी चालेल, आता तक्रार करणार
आरोपींच्या सततच्या पैशांच्या मागणीतून वैतागलेले विठ्ठल मुळे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विठ्ठल मुळे यांना विश्वासात घेतले. आरोपींना पैसे घेण्यासाठी अहमदपूर बस स्थानकात बोलावले. तिघांपैकी मुसा शेख एक लाख रुपये घेण्यासाठी आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली. तर, यातील महिला आरोपी रुपाली ढगे हिस कोळेगाव रोड भागातून अटक करण्यात आली आहे. यातील तिसरा आरोपी गुलाबसाब शेख फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी बाहेर गावी पाठवण्यात आले आहे.