एक्स्प्लोर
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून 280 कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.

silver Brick of 6500 kg in mumbai vikroli
1/7

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून 8 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 280 कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
2/7

राज्यातील विविध जिल्ह्यात, मतदारसंघात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करुन मौल्यवान वस्तू व रोकड जप्त करण्यात आली आहे.
3/7

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एक व्हॅन पोलिसांनी पकडले होते, त्यामध्ये दागिने व मौल्यवान वस्तू होत्या. त्यानंतर, आता मुंबईत चांदीच्या वीटांनी भरलेली व्हॅन पोलिसांनी पकडली आहे.
4/7

विकोळी पोलिस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या वीटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत
5/7

व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे.
6/7

पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे.
7/7

दरम्यान, पोलिसांकडून सर्वच मतदारसंघात वाहनांवर व अवैध वाहतुकीवर करडी नजर असून अनाधिकृतपणे पैशांची वाहतूक करण्यात येत असल्यास कारवाई केली जात आहे.
Published at : 10 Nov 2024 03:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
