एक्स्प्लोर

Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल

Nashik West Assembly Constituency : सिडकोतील सावतानगर परिसरातील हनुमान चौक परिसरात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर असताना सावतानगर येथील हनुमान मंदिर परिसरात मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा गट (Shiv Sena UBT) आणि भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले आहे. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्तांसह संपूर्ण नाशिक शहरातील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) अवतीभवती तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यासह दोन्ही बाजूच्या 30 हून अधिक  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील सावतानगर परिसरातील हनुमान चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ठाकरे गटाचे काही पदाधिकारी मतदारांना स्लिपा वाटत होते. यावेळी महायुतीच्या तसेच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी स्लिपा वाटपाबरोबर पैसेही वाटप होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी घटनास्थळी गेले. 

हाणामारीत दोन जण जखमी

यावेळी जोरदार शिवीगाळ झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी दोन्हीही गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याभोवती जमाव जमवला कारवाईची मागणी केली. दरम्यान, स्वामी विवेकानंदनगर येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचीही सभा होती. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच त्यांनीही पोलीस ठाणे गाठले व पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल 

यानंतर आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राडा केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही बाजूच्या 30 हून अधिक  जणांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल माजवणे, जीवितास धोका पोहचविणे, सार्वजनिक शांतताचा भंग केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. 

आणखी वाचा 

नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget