Chandrapur Crime: धक्कादायक! गाडीला कट लागल्याचा वाद विकोपाला; अल्पवयीन 4 मुलांनी एकाला संपवलं, चंद्रपूर हादरलं!
Chandrapur Crime News : चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीने जाताना गाडीचा कट लागून नुकसान झाल्यामुळे ही हत्या केल्याचे कारण पुढे आले आहे. कट लागल्यावर एका युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. नुकसान भरपाई घेण्यासाठी गौतमनगर परिसरातून जात असतांना मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत एकाची हत्या केली आहे.
हत्येनंतर मृतदेह झुडुपात फेकून दिला
पुढे आलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयतने आपल्या भावाला या संपूर्ण प्रकरणाच्या घटनेची माहिती दिली होती. मात्र बराच वेळ मृतक तरुणाचा शोध न लागल्याने आणि मोबाईल ट्रेस न झाल्याने मृतकाच्या भावाने पोलीस तक्रार केली. तर तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता तपासादरम्यान हे प्रकरण पुढे आले आहे. यात चार अल्पवयीन आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेह झुडुपात देखील फेकून दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 ते 17 वर्षांच्या 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...
दुसरीकडे दादरमधून (Dadar News) अशीच एक संतापजनक बातमी समोर येत आहे. पीटीच्या शिक्षकाने (Teacher) विद्यार्थिनीचा शाळेतच (Student) विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गौरव चौहान असे शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या पूर्व परिसरात असलेल्या एका शाळेत 12 वर्षीय मुलगी शिकत आहे. 27 डिसेंबर रोजी मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती. मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला. वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवने वर्गाचा दरवाजा बंद केला.
मुलीने पालकांना सांगितली आपबिती
त्यानंतर गौरवने मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गैरवर्तन केले. शाळेतील पीटी शिक्षकाच्या या वर्तनानंतर मुलगी मानसिक तणावात होती. पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. यानंतर पालकांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा