Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Palghar News: शिवसेना शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान या प्रकरणाचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना काही अंशी यश आले आहे.

पालघर: शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान या प्रकरणाचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. अशोक धोडी यांच्या अपहरणाचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी गुजरातमधील भिलाड जवळ त्यांच्या कारचा शोध लावलाय. तर याच कारमध्ये अशोक धोडी (Ashok Dhodi) यांचा मृतदेह असण्याची शक्यताही जवळ जवळ सुनिश्चित असल्याचे बोलले जात आहे.
या कारचा शोध गुजरातमधील सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीतील तलावाजवळ लागाला आहे. दरम्यान आता पोलिसांनी ही कार बाहेर काढली आहे. तर ही कार अशोक धोडी यांचीच असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पालघर (Palghar) पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे तलावातून कार बाहेर काढण्यापूर्वी काळं जॅकेट आणि पांढरा हेडफोनही हाती लागला आहे. आता, कारमध्ये मृतदेह आहे का? याचा तपास केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी झाली असून तलावाकाठी मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, कार काढण्यासाठी हायड्रा आणि गोताखोरांची मदत घेतल्या नंतर कार आता बाहेर काढण्यात आली आहे. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने कार काढण्यामध्ये मोठ्या अडचणी आल्याचेही बघायला मिळाले आहे. या शोध मोहिमेमध्ये गोताखोरांनी एक काळ्या रंगाचे जॅकेट मिळाले असून त्यामध्ये सफेद रंगाचा हेडफोन ही मिळाला आहे. त्यामुळे याच परिसरात मृतदेह असण्याची ही शक्यता अधिक बळावली आहे. मात्र अद्याप तरी या बाबतीत कुठलाही खुलासा पोलिसांनी केलेला नाही.
या प्रकरणात माझं बारीक लक्ष, दोषीवर होणार कठोर कारवाई- अशोक धोडी
अशातच, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अशोक धोडी यांच्या कुटुंबियांची आज (31 जानेवारी) भेट घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणावर माझं बारीक लक्ष असून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असं मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं. तसेच लवकरच याचा प्रकरणाचा छडा लागेल असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
