एक्स्प्लोर

मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड

मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी करू काय, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावेळी झालेली परिस्थितीवर बोलताना, वेगवेगळी परिस्थिती घडत असते, पण हरकत नाही. मला मंत्री का केलं नाही हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जास्त बोलणे टाळले. पण, राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल पदासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी करू काय, असा थेट सवाल भुजबळ यांनी विचारला आहे. दरम्यान, नाराज झालेल्या छगन भुजबळ यांना राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल (Governor) पदाची संधी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू असतानाचा भुजबळ यांनी थेट नकार दिला आहे. 

मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी करू काय, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. माझं काम गोरगरिबांच्या अडचणी सोडवणं आहे, त्यांच्यासाठी भांडणं आहे. राज्यपाल होऊन मी त्या समस्या सोडू शकणार आहे का? मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही. पण, मी असा मोकळा ठीक आहे अशा शब्दात राज्यपाल पदही आपणास नको असल्याची भूमिका भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली. 

लोकसभेवेळीही तिकीटासाठी उशीर केला

लोकसभा निवडणुकांवेळी तुम्हालाचा उभ राहावं लागेल एस मला सांगितले होते. नाशिकमध्ये तुम्ही चांगलं काम केल आहे, सर्व समाज आपल्यासोबत आहे. एक महिना झाला, पण माझ नाव जाहीर केलं नाही, त्यामुळेच मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. राज्यसभा आली तेव्हा मी म्हणालो राज्यसभेवर जातो. मात्र, सुनेत्रा निवडणुकीत पडलेल्या आहेत, त्यांना राज्यभेत पाठवलं. दुसरी राज्यसभा आली तेव्हा नितीन पाटील यांना करायचं, त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही. यावेळी, स्वत: का निर्णय घेतला असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. 

माझ्या लोकांना वाऱ्यावर कसा सोडू?

निवडणुकीत जरांगे पॅटर्न आला,पण जरांगे कुठेच आले नाहीत. ते येवल्यात आले आणि लीड कमी झालं आणि 60 हजारांनी निवडून आलो. परत मला म्हणाले विधानसभेचा राजीनामा द्या, मी लोकांना वाऱ्यावर कसं सोडू मी म्हणालो दोन वर्षानी बघू, असे म्हणत भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली. मला वाटल माझं नाव मंत्रिपदासाठी येईल. कारण, पक्ष स्थापनेपासून मी पक्षासोबत आहे. अजित पवारांना पहिला पाठिंबा देणार मीच होतो. त्यामुळे, मानसन्मानला धक्का लागला तर ते योग्य नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले. मात्र, अजित पवार यांचं नेतृत्व चांगलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा

मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Lawande and Sangram Bhandare: शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
Vikas Lawande Attack and Shaifek: विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल
विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल
Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, इम्तियाज जलील, ओवैसींवर गंभीर आरोप
TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, इम्तियाज जलील, ओवैसींवर गंभीर आरोप
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
Vikas Lawande and Sangram Bhandare: शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Embed widget