IT क्षेत्र सोडलं, नवीन क्षेत्र निवडलं, आज पती-पत्नी करतायेत कोट्यावधींची उलाढाल
Success story : अहमदाबादच्या पती-पत्नीने आयटी क्षेत्रातील (IT sector) चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला आहे. या नवीन व्यवसायातून ते कोट्ावधी रुपयांची उलाढाल करत आहेत.
Success story : अलीकडच्या काळात अनेक लोक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या (Job) सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. या व्यवसातानू ते चांगला नफा देखील कमावत आहेत. आज आपण अशीच एक यशोगाथा (Success story) पाहणार आहोत. अहमदाबादच्या पती-पत्नीने आयटी क्षेत्रातील (IT sector) चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला आहे. श्रीकांत मालदे आणि त्यांची पत्नी चार्मी यांची दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा व्यवसायाचा सुरु केला आहे. या व्यवसायातून ते आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा
गौणिती ऑरगॅनिक्स या डेअरीची स्थापना
श्रीकांत मालदे आणि त्यांची पत्नी चार्मी यांनी 2017 मध्ये शुद्ध आणि निरोगी दुग्धजन्य पदार्थ विकण्यासाठी 'गौणिती ऑरगॅनिक्स' या डेअरी ब्रँडची स्थापना केली आहे. या ब्रँडने गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 2014 मध्ये जेव्हा श्रीकांत यांच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले होते. तेव्हा या घटनेने दोघांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीचा विचार करण्यास भाग पाडले. वडील गेल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केले. त्यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांबद्दल जागरुकता वाढवली. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय उत्पादने आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायींची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतची माहिती घेतली.
4 गायींपासून गौणिती ऑरगॅनिक्सची सुरुवात
श्रीकांत आणि चार्मी यांनी चार गायींपासून व्यवसाय सुरु केला. पूर्वी ते फक्त दूध आणि तूप विक्री करत होते. त्यांना हळूहळू सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली. हळूहळू 'गौनिती ऑरगॅनिक्स'च्या उत्पादनांची मागणी वाढू लागली, ज्यामध्ये ते फक्त गाईच्या दुधापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. यामध्ये मलाई पनीर, देशी तूप इत्यादी तयार करुन विकतात. याशिवाय, त्यांनी अलीकडे हेल्दी न्यूट्रीबार आणि तूप बिस्किटे यांसारख्या नवीन उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. तसेच अगरबत्ती आणि अगरबत्ती यासारख्या वस्तू बनवण्यासाठी ते देशी गायीच्या शेणाचा वापर करत आहेत. आता त्यांनी गायींची संख्या देखील वाढवली आहे. सध्या त्यांच्याकडे 100 हून अधिक गायी आहेत.
व्यवसायातून करोडो रुपयांची कमाई
श्रीकांत आणि चार्मी आज या व्यवसायातून करोडो रुपयांची कमाई करत आहेत. गायींची काळजी घेणे, हवामानातील आव्हाने, मजुरांचे व्यवस्थापन अशा अनेक समस्यांना त्यांना सुरुवातीला तोंड द्यावे लागले. मात्र, दोघांनीही सर्व परिस्थितीला तोंड देत आपला ब्रँड तयार केला आहे. आज त्यांची उत्पादने ऑफलाइन आणि ऑनलाइन विकली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या: