success story : गगनभरारी! 5000 रुपयांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, आज 400 कोटी रुपयांची उलाढाल
ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी वारी एनर्जीने शेअर बाजारात (Share Market) प्रवेश केला आहे. या कंपनीला गुंतवणूकदारांचा मोठापाठिंबा मिळत आहे.
Success Story : ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी वारी एनर्जीने (Waaree Energies) शेअर बाजारात (Share Market) प्रवेश केला आहे. कंपनीच्या शेअरला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा (Investment) मोठा पाठिंबा मिळत आहे. यासह, सोलार सेल बनवणारी वारी एनर्जीजचे अध्यक्ष आणि एमडी हितेश चिमणलाल दोशी (Hitesh chimanlal doshi) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आले आहेत. हितेश दोशी यांनी 1985 मध्ये केवळ 5000 रुपये कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. आज हितेश दोशी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 5.2 अब्ज डॉलर म्हणजे अंदाजे 400 कोटी रुपये आहे. हितेश दोशी यांनी त्यांच्या गावातील मंदिरावरुन कंपनीला नाव दिले आहे.
वारी एनर्जीज (Waaree Energies) ही देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनी बनली आहे. वारी ग्रुपच्या वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज आणि वारी टेक्नॉलॉजीज आधीच सूचीबद्ध केल्या गेल्या आहेत.
IPO ने दोशी कुटुंबाची एकूण संपत्ती केली दुप्पट
हितेश चिमणलाल दोशी हे जवळपास 40 वर्षांपासून वारी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये त्याची गणना होते. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, Vaari Energies ची इश्यू किंमत 1503 रुपये होती. पण त्याची लिस्टिंग 997 रुपयांनी वाढून 2500 रुपये झाली. त्यामुळे दोशी कुटुंबाची एकूण संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. हितेश दोशी यांचे दोन भाऊ आणि पुतणे कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. दोशी कुटुंब हे वारी ग्रुपच्या अभियांत्रिकी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज आणि वारी टेक्नॉलॉजीजचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. या दोन्ही कंपन्यांची लिस्टिंग आधीच झाली आहे.
Waari Energies ही सर्वात मोठी सोलर मॉड्युल उत्पादक कंपनी
Waari Energies ही भारतातील सर्वात मोठी सोलर मॉड्युल उत्पादक कंपनी आहे. त्याची क्षमता 1200 मेगावॅट आहे. त्याचा बहुतांश महसूल अमेरिकेतील निर्यातीतून येतो. चीनच्या सोलर सेलवरील वाढीव शुल्काचा कंपनीला खूप फायदा झाला आहे. या वर्षी सौर साठ्यातही बरीच वाढ दिसून येत आहे. कंपनीच्या IPO ने चांगला परतावा देऊन गुंतवणूकदारांना खूश केले आहे. कंपनी IPO मधून 2,800 कोटी रुपये ओडिशामध्ये 6 GW उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी वापरणार आहे.
गावातील मंदिरावरुन वारी हे कंपनीला दिलं नाव
हितेश चिमणलाल दोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील तुणकी गावात झाला. मुंबईत शिकत असताना त्यांनी 1985 मध्ये 5000 रुपये कर्ज घेऊन हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. या पैशातून तो कॉलेजची फी आणि इतर खर्च भागवत असे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि प्रेशर गेज, गॅस स्टेशन आणि औद्योगिक व्हॉल्व्ह तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर ते जर्मनीला गेले आणि तिथून सोलर सेल निर्मितीकडे वळले. त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव त्यांच्या गावात असलेल्या वारी मंदिरावरून ठेवले.
महत्वाच्या बातम्या: