(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Metro Brands IPO : मेट्रो ब्रँड्स कंपनीचा आयपीओ ओपन; Big Bull राकेश झुनझुनवालांचीही गुंतवणूक, डिटेल्स काय?
IPOs This Week : Metro Brands IPOs : Big Bull राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असेलेली मेट्रो ब्रांड्स (Metro Brands) कंपनीचा आयपीओ आज ओपन झाला.
IPOs This Week : Metro Brands IPOs : Big Bull राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असेलेली मेट्रो ब्रांड्स (Metro Brands) कंपनीचा आयपीओ आज ओपन झाला. हा आयपीओ 10 डिसेंबर रोजी म्हणजेच, आज ओपन झाला आहे. तर 14 डिसेंबरपर्यंत याचं सबस्क्रिप्शन करता येणार आहे. फुटवेअर क्षेत्रातील आघाडीची रिटेलर मेट्रो ब्रांड्स कंपनीला आईपीओच्या मार्फत 1370 कोटी रुपये जमा करण्याची आशा आहे. मेट्रो ब्रांड्स कंपनीची ब्रँड प्राइज 485 रुपये ते 500 रुपये प्रति शेयर आहे. कंपनीकडून 30 शेअर्ससाठी 15,000 रुपयांचा एक लॉट ठरवण्यात आला आहे. कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 1.95 लाख रुपयांचे 13 लॉट घेण्यासाठी अप्लाय करु शकतो. SEBI नं या आयपीओला मंजुरी दिली आहे.
कंपनीने काल (गुरुवारी) जाहीर केलं की, बुधवारी तिचा IPO रोलआउटपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून ₹410 कोटींहून अधिक रक्कम गोळा केली आहे.
मेट्रो आयपीओचा किंमत बँड
मेट्रो ब्रँड्सने प्रत्येकी ₹5 दर्शनी मूल्यावर प्रति इक्विटी शेअर ₹485-500 किंमत बँड निश्चित केला आहे.
15 टक्के भागीदारी
दरम्यान, मेट्रो ब्रांडमध्ये राकेश झुनझुनवाला यांची जवळपास 15 टक्के भागीदारी आहे. मेट्रो ब्रांड्सचा आयपीओ (IPO) 10 डिसेंबर म्हणजेच, आज सब्स्क्रिप्शनसाठी ओपन झालं आहे. तसेच 14 डिसेंबर रोजी बंद होणार आहे.
295 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील
फुटवेअर क्षेत्रातील रिटेवर ब्रँड्स आयपीओ अंतर्गत 295 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहेत. याशिवाय, प्रवर्तक आणि इतर भागधारक 2.14 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. IPO कागदपत्रांनुसार, कंपनीचा IPO 14 डिसेंबर रोजी बंद होईल.
IPO द्वारे 10 टक्के स्टेक विकणार
IPO च्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक त्यांचे जवळपास 10 टक्के स्टेक विकणार आहेत. आयपीओ (IPO) नंतर कंपनीतील प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाची भागीदारी सध्याच्या 85 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर येईल.
कंपनीचे 586 स्टोअर्स
दरम्यान, मेट्रो कंपनी IPO मधून उभारलेल्या पैशाचा वापर 'मेट्रो' Metro, 'मोची', 'वॉकवे' आणि 'क्रॉक्स' या ब्रँड अंतर्गत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट व्यवसायासाठी करेल. सध्या देशातील 134 शहरांमध्ये कंपनीचे 586 स्टोअर्स आहेत. यापैकी 211 स्टोअर्स गेल्या तीन वर्षांत सुरु करण्यात आले आहेत.
कंपनीची प्रोफाइल
कंपनीच्या काही प्रसिद्ध ब्रँड्समध्ये मेट्रो, मोची, वॉकवे, दा विंची आणि जे. फोंटिनी यासोबत क्रॉक्स, स्केचर्स, क्लार्क्स, फ्लोर्सहायम आणि FitFlop सारखे काही तृतीय पक्ष ब्रँडचा समावेश आहे. मेट्रो ब्रँड्स त्यांच्या स्टोअरमध्ये बेल्ट, बॅग, पायमोजे, मास्क आणि वॉलेट यांसारख्या अॅक्सेसरीज विकतं. कंपनी आपल्या स्टोअरमध्ये एम.वी. शू केयर प्रायव्हेट लिमिटेडसोबत संयुक्त उपक्रमात किरकोळ विक्री करते.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात 10 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले होते. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि टेगा इंडस्ट्रीजचे आयपीओ खुले आहेत. याच महिन्यात या कंपन्या बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. मागील महिन्यात पेटीएम कंपनी सूचीबद्ध झाली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे गुंतवणुकदारांना परतावा मिळाला नाही. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी लोअर सर्किट लागले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; व्याज दर जैसे थे!
- ITR: तुम्ही स्वत: भरा आयकर रिटर्न'; जाणून घ्या सोपी पद्धत
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह