लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
होंडा कंपनीकडून आपल्या कर्नाटकमधील प्लँटवर इलेक्ट्रिक टु-व्हीलरसाठी विशेष प्रोडक्शन लाइन सेट करण्यात आली आहे.
मुंबई : होंडा कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटीची (EV) भारतात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे, मात्र अद्यापही ही प्रतिक्षा संपताना दिसून येत नाही. त्यामुळे, ग्राहकांना यंदाच्या दिवाळीत तरी इलेक्ट्रिक स्कुटी आपल्या घरी आणता येणार की नाही, याबाबत आता होंडा कंपनीकडूनच माहिती देण्यात आली आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचा कौल इव्ही वाहनांकडे झुकला आहे. चारचाकी इव्ही वाहनांनाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. तर, दुचाकी खरेदी करणाऱ्यांनाही इलेक्ट्रिक स्कुटरला पंसती देऊ केली आहे. आता, होंडाची (Honda) इव्ही स्कुटर बाजारात कधी येणार याबाबत कंपनीचे सीईओ त्सुत्सुमु ओटानी (Tsutsumu Otani) यांनी माहिती दिली असून मार्च 2025 पर्यंत होंडाची इलेक्ट्रिक स्कुटर भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांना होंडाच्या स्कुटीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
होंडा कंपनीकडून आपल्या कर्नाटकमधील प्लँटवर इलेक्ट्रिक टु-व्हीलरसाठी विशेष प्रोडक्शन लाइन सेट करण्यात आली आहे. त्यामुळे, होंडाच्या इ स्कुटरचे उत्पादन डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर, मार्च 2025 मध्ये ही स्कुटी लाँच करण्यात येईल. सध्या दिवाळी आणि सणांचा उत्साह असल्याने ग्राहकांची बाजारात रेचचेल पाहायला मिळते. त्यामुळेच, सोशल मीडियावरही नव्या खरेदीसंदर्भात नेटीझन्स मतं व्यक्त करतात. त्यात, होंडाच्या इलेक्ट्रीक स्कुटरचीही जोरदार चर्चा नेटीझन्सकडून केली जात आहे. एक्टिव्हा इलेक्ट्रिक या नावाने ही इव्ही स्कुटर ओळखली जाईल. होंडा एक्टिव्हाच्या शेअर मार्केटवरही या स्कुटरच्या लाँचिंगचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
फिक्स्ड आणि रिमूव्हेबल बॅटरी
होंडा इलेक्ट्रिक स्कुटरच्या पॉवरट्रेनच्या बाबतीत अद्याप कुठलीही माहिती समोर आली नाही. सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये Vida V1 duo ही गाडी रिमूव्हेबल बॅटरीसह उपलब्ध आहे. तर, बाकी भारतीय स्कुटर ह्या फिक्स्ड बॅटरीसह रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, होंडा कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात उतरण्यापूर्वीच देशातील काही मेट्रो शहरांत बॅटरी-स्वॅपिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, फिक्स्ड बॅटरीसह होंडाची स्कुटर मार्केटमध्ये येईल, असे बोलले जाते.
भारतातील लोकप्रिया दुचाकी होंडा एक्टिव्हा
दरम्यान, गतवर्षी होंडा कंपनीने भारतात दोन इलेक्ट्रिक स्कुटरवर काम सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये, एक फिक्स्ड बॅटरीसह आणि एक रिमूव्हेबल बॅटरीसह स्कुटर बाजारात उतरवण्यात येणार आहे. मात्र, दोन्हीपैकी कोणतं मॉडेल सर्वात अगोदर लाँच केलं जाईल, याची माहिती कंपनीने दिली नाही. सध्या भारतात होंडा एक्टिव्हा कंपनीच्या 30 मिलियन्स दुचाकींची विक्री झाल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवरुन दिली आहे.
हेही वाचा
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य