एक्स्प्लोर

नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य

नागपूरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नागपर : शहरातील हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawnkule) यांच्या मुलाचे नाव आल्यानंतर याप्रकरणी राजकारण तापलं असून पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर काम करत आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरमधील (Nagpur hit and run) पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना घटनेबाबत अनेक प्रश्न विचारले होते. तसेच, या घटनेतील एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेंचं नाव का नाही, असा सवालही त्यांनी विचारला होता.दुसरीकडे सत्ताधारी भाजप पोलिसांवर दबाव आणत असल्याच्या आरोपांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खंडन केले आहे. त्यांनी म्हटले की, पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही. मी कधीही पोलिसांना (Police) फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली, असे बावनकुळे यांनी म्हटले. आता, याप्रकरणी ताजी अपडेट समोर आली असून सीसीटीव्ही संदर्भात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नागपूरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे चारहीजण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्हमध्ये पाहण्याची सोय असून त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा चारही तरुण तिथे गेले असतानाही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याचे दिसून आलेले नाही.  

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुढील तपासणीसाठी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहे. त्यामुळे जर काही फुटेज त्या डीव्हीआरमधून डिलीट केले गेले असतील, तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीत समोर येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाहोरी हॉटेल ते अपघात स्थळादरम्यान तीन ते चार ठिकाणांचे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामध्ये दिसत असलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर पोलिसांचा सध्याचा तपास सुरू आहे. मात्र, हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये चारही मुले दिसून न आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. 

पोलीस कोणते गुन्हे दाखल करणार

पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो, माझा असो वा सामान्य घरातील, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. फक्त आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल होणार? पोलीस सध्या त्यादृष्टीने तपास करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

हेही वाचा

लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget