एक्स्प्लोर

BLOG | हा खेळ आकड्यांचा!

राज्यातले नव्या कोरोनाबाधितांचे आकडे रोज नवीन उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे प्रशासन कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. जर रुग्णसंख्या वाढतच राहिली तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाईलाजास्तव लॉकडाऊन करावा लागणार असल्याच्या शक्यता राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली आहे. गेले अनेक दिवस नागरिकांनी 'कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर' असावा यासाठी सर्व स्तरातून माहिती देण्यात आली. मात्र, नागरिकांनी 'ऐकूनही न ऐकल्यासारखं' करून स्वतःला वाटेल तसा वावर सुरु ठेवला आहे. शेवटी राज्य सरकारने रात्रीची जमावबंदी जाहीर केली. लॉकडाऊनच्या दिशेने असणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. रात्रीची जमावबंदी करून काय साधणार? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. दिवसाची जमावबंदी केली तर लॉकडाऊन सदृश्य वातावरण होईल. रात्रीची जमावबंदी हा केवळ एक इशारा आहे, तो ओळखता आला तर नक्कीच यामध्ये सर्वांचं हित आहे, नाहीतर पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनमध्ये लोटण्यात सगळ्या नागरिकांचा सहभाग असेल हे निश्चित. बाधित रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या या आकड्यांच्या निर्णायक खेळावर सध्या प्रशासनासोबत नागरिकांचेही लक्ष लागून राहिलं आहे. आपण सध्या कोरोना लढाईच्या अंतिम टप्प्यात आहोत, लसीकरण करून घ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.

कोरोनाच्या काळात प्रत्येकांचं लक्ष हे आंकड्यावर असतं, किती वाढले आणि किती कमी झाले, तर किती मृत्यू पावले. साथीच्या आजारात आकड्यांना फार महत्त्व असतं. यामध्ये फक्त आकडेच बघितले जातात असं नाही तर त्यांचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून अहवाल सादर करावा लागतो. त्या अहवालाच्या आधारवर अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक धोरणं ठरत असतात. रुग्ण किती बरे झाले, किती नव्या रुग्णांचे निदान झाले, किती गंभीर आहेत, किती रुग्णांना सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत, किती रुग्ण गंभीर किंवा अतिगंभीर आहेत, किती रुग्ण लक्षणविरहित आहेत, किती लोकांना विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णाच्या वाढीचा दर काय आहे, रिकव्हरी रेट किती आहे, मृत्यू दर किती आहे. या आणि आणखी काही सर्व आकड्याची रोज गोळा बेरीज, गुणाकार, भागाकार आणि विविध जनऔषध शास्त्रातील फॉर्म्युल्यांचा वापर करून  दिवसभराची आकडेवारी सर्व जिल्ह्यातून घेऊन ती विस्तृतपणे नागरिकांना समजेल या भाषेत मांडण्याचा काम, राज्य आरोग्य संचालनयाचा एकात्मिक रोग सर्वेक्षण विभाग हा दररोज करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने कीटकशास्त्र तज्ञ, साथरोगशास्त्र तज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ, प्रशिक्षण सल्लागार आणि डेटा मॅनेजर ह्या माहितीसाठी रोज मेहनत घेत असतात. 

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित 10 जिल्ह्यांपैकी तब्बल 9 एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यावरून राज्यातील कोरोनाची दाहकता लक्षात यायला हवी. राज्यातील काही शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्सची टंचाई भासायला सुरुवात झाली आहे. रोज बाधितांचा नवीन आकडा नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती अधिक बिकट असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगतात. प्रशासनाने रात्रीची जमावबंदी केली आहे ह्याचे गांभीर्य नागरिकांनी व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊन हा कुणालाच ना शासनाला ना नागरिकांना परवडणारा आहे. लोकांचे लॉकडाऊनमध्ये काय हाल होतात हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. त्यामुळे आताच नागरिकांनी वेळीच सावध होऊन आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. पण आकडा वाढलाच तर कुठेतरी ती साखळी तोडण्यासाठी वर्दळीवर बंधन आणण्याकरिता नाईलाजास्तव लॉकडाऊन करावा लागणार आहे. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर गर्दी होणार नाही आणि गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी लागेल. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, त्याचा प्रादुर्भाव कुटुंबातील एका व्यक्तीला झाला की पूर्ण कुटुंब या आजाराने बाधित होत असल्याचे गेल्या काही आठवड्यांपासून दिसत आहे. पहिल्या लाटेपेक्षा हा प्रकार थोडा वेगळा आणि काळजी करायला लावणारा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार केल्याने रुग्ण हमखास बरा होत असल्याचे दिसून आले आहे. कोणतेही लक्षण आढळून आल्यास स्वतः औषध घेत बसू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून वेळेत औषधे घ्यावी.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "शेवटी कुठेतरी वाढती रुग्णसंख्येची साखळी मोडावी लागणार आहे. त्यामुळे नाईलाजास्तव लॉकडाऊन करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यासारख्या शहरात बेड्सची टंचाई निर्माण झाली आहे. कोविड केअर सेंटर भरली आहेत. सरकारी रुग्णालयातील खाटा रिकाम्या नाहीत. रुग्णसंख्या वाढत आहे, यामध्ये अनेक लक्षणविरहित रुग्णांचा समावेश आहे त्याचे घरी व्यवस्थित अलगीकरण केले जात नाही. नोकरी काम धंदा करणाऱ्या तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात या संसर्गाचा फटका बसला आहे. लॉकडाऊनची लोकांना भीती वाटत आहे. कारण रोजगावर कुऱ्हाड आली तर खाणार काय? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. लॉकडाऊन नको असेल तर मग नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. लॉकडाऊन करायचा असेल त्याच्या आधी प्रशासनाला सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये ज्या चुका घडल्या त्या या लॉकडाऊन लावल्याने होऊ नये. असं वाटत असेल तर प्रत्येक जिल्ह्याचं आणि शहराचं बारकाईने व्यवस्थापन करावे लागणार आहे. वर्क फ्रॉम ऑफिस जेथे शक्य आहे तेथे पुन्हा चालू केलं पाहिजे. ऑफीसच्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज आहे. ज्या प्रमाणात रुग्णांचे आकडे वाढत आहेत, ते पाहता ते झटकन कमी होणार नाहीत. त्याचबरोबर आपल्याकडे लसीकरण अजूनही संथ गतीने सुरु आहे, ते वेगानं वाढलं पाहिजे. सरसकट डॉक्टरांना लसीकरण करण्याची परवानगी दिली पाहिजे."        

याप्रकरणी डॉ. प्रदीप आवटे, ते राज्याच्या आरोग्य विभागात सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम करत आहेत, त्यांनी यापूर्वीच या रोजच्या आकड्याबद्दल माहिती देताना सांगितले होते की, "आकडे हे आकडे नसतात, प्रत्येक आकड्यांमागे एक माणूस उभा असतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही म्हटता की 5,218 रुग्णांना बाधा झाली, तेव्हा ती 5,218 ही माणसे असतात. अमुक इतके मृत्यू झाले, तो मृत्यूचा आकडा नसतो तो प्रत्येक मृत्यू म्हणजे एक माणूस आहे, त्याचं आपलं एक कुटुंब आहे त्याची एक सामाजिक संस्था-व्यवस्था आहे. त्या सगळ्या आकड्याकडे तुम्हाला सहानुभूतीने आणि सहृदयतेने पाहता आले पाहिजे, हे का झालं, हे आपल्याला टाळता येईल का, यांच्यामध्ये आणखी काय करता येईल. आकड्याकडे तुम्ही जेव्हा या अर्थाने पाहाल तेव्हा ते आकडे तुमच्याशी बोलू लागतात आणि आकडे तुम्हाला खूप काही आकड्याच्या मागची कहाणी सांगू शकतात. तसेच आत्ताच्या आरोग्य विभागामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे जर तुम्हाला एखादी समस्या सोडवायची असेल तर ती नेमकी समस्या मोजा. त्या मोजमापातच 50 टक्के उत्तर आहे. त्यामुळे नीट समस्या मोजणं हे आमचं काम आहे. सर्वेक्षण विभाग हा कोणत्याही आरोग्यव्यवस्थेचा कणा असतो. यामुळे अनेक धोरणं ठरतात. एखाद्या कार्यक्रमाला त्याची गांभीर्यता बघून निधी ठरत असतो.
  
राज्यातील खासगी आणि सरकारी आरोग्ययंत्रणा काम करत आहे. मात्र, त्यांना पण नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. अनेकजण आजही लसीकरणासाठी केंद्रावर जात नाहीत. लसीकरणामुळे या आजारापासून संरक्षण निर्माण होते हे अनेकवेळा वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे, तरीही खूप मोठा आकडा अद्याप बाकी आहे. शहरी भागात लसीकरण होत आहे. मात्र, ग्रामीण भागात फार कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्याचा वेग वाढवायला पाहिजे. कारण बाधितांचा आकडा वाढत असल्याने या आजारापासून संरक्षण देणारी लस पात्र नागरिकांना मिळाली तर तेवढे लोक सुरक्षित होतील. लवकरच 1 एप्रिल पासून 45 वर्षे वयावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यावेळी सगळ्या पात्र नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली पाहिजे. प्रशासनाने जे काही सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत त्याचे पालन या काळात जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनीच केलं पाहिजे. एप्रिल आठवडा हा लॉकडाऊनच्या अनुषंगाने निर्णायक असणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी आजपासून काळजी घ्या. गेल्या वर्षभरात नागरिक आरोग्य साक्षर होणे अपेक्षित होते आणि ते झाले नसतील तर सगळाच आनंद आहे असंच म्हणावं लागेल. कोरोना हा साथीचा आजार आहे. तो काही राजकीय विषय नाही अशा परिस्थितीत कुणीही कुठलेही राजकरण न आणता (चुका होत असतील तर त्यावर बोट ठेवलेच पाहिजे) या संकटसमयी एकत्र उभे राहिलं पाहिजे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget