Vastu Tips : गहाण ठेवलेलं सोनं मिळेल; फक्त 'हा' एकच उपाय करा, लक्ष्मी घरात येईल धावून, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : वास्तूशास्त्रात, घरातील सोनं परत कसं आणता येईल याच संदर्भात महत्त्वाचा उपाय सांगण्यात आला आहे.

Vastu Tips : आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना आयुष्यात कधीना कधी पैशांची (Money) कमतरता भासते. अशा वेळी आपण एकतर कर्ज काढतो, मित्र-नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतो किंवा अगदीच गरज भासल्यास नाईलाजाने आपण घरातील सोनं (Gold) गहाण ठेवतो. अशा वेळी कर्ज काढलेलं फेडता येऊ शकते. मित्रांचे उसणे घेतलेले पैसे काही कालावधीने परत करता येतात. पण, गहाण ठेवलेलं सोनं गरात परत कसं आणायचं या संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो.
वास्तूशास्त्रात, घरातील सोनं परत कसं आणता येईल याच संदर्भात महत्त्वाचा उपाय सांगण्यात आला आहे. या उपायाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे दागिने घरात आणू शकता.
सोनं जर गहाण ठेवलेलं असेल तर ते लवकरात लवकर सोडवण्याकरता 'हा' उपाय करा
वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जर तुम्हाला लवकरात लवकर सोनं हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला पैशांची सुविधा करावी लागते. कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात. अनेकदा लोक सोनं सोडविण्यासाठी कर्जदेखील काढतात. या दरम्यान आपल्याला मेहनत तर घ्यायचीच आहे. उत्पन्नाची साधनं तर वाढवायचीच आहेत. पण, त्याचबरोबर तुम्ही काही उपाय देखील तुम्ही तुमचं सोनं सोडवू शकता. यामुळे तुमचं गहाण ठेवलेलं सोनं लवकरात घरात येईल.
उपाय :
एका काचेची वाटी घ्या. ही वाटी तुम्हाला घराच्या पश्चिम कोपऱ्यामध्ये किंवा पश्चिम दिशेला असणारं कपाट त्या ठिकाणी ठेवायची आहे. ही वाटी रिकामी ठेवायची आहे. त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही दुकानात जाता तेव्हा 5-5 रुपयांची नाणी, जी पिवळ्या रंगाची असतात ती नाणी तुम्ही वाटीत जमा करायची आहेत. जसजशी तुम्ही ती नाणी जमा करत जाल त्यानंतर लवकरात लवकर तुमच्या घरात तुमचं गेलेलं सोनं परत मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Numerology : 'या' जन्मतारखेच्या सूना असतात सासूंच्या लाडक्या, बॉंडिंग असतं एकदम भन्नाट, कौतुक कराल तितकं कमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

