Astrology News : कुंडलीत सूर्याच्या अशुभ प्रभावाने मिळतात 'हे' संकेत, वेळोवेळी करा 'हे' उपाय; अन्यथा...
Astrology News : जर तुमच्या कुंडलीत सूर्य अशुभ फळ देणार असेल तर तो सक्रिय होण्याआधी पूर्व घरात ऊर्जा देणाऱ्या वस्तू नष्ट होतील.
![Astrology News : कुंडलीत सूर्याच्या अशुभ प्रभावाने मिळतात 'हे' संकेत, वेळोवेळी करा 'हे' उपाय; अन्यथा... Astrology News sun in low zodiac sign causes difficulty in everyday life marathi news Astrology News : कुंडलीत सूर्याच्या अशुभ प्रभावाने मिळतात 'हे' संकेत, वेळोवेळी करा 'हे' उपाय; अन्यथा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/25/a7aa343b30ccf816764172ef49abda0f1727233101045358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Astrology News : प्रत्येक ग्रहांचा राशींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतो. ज्या ग्रहाच्या दशेवर परिणाम होतो त्याच्या स्थितीनुसार, शुभ-अशुभ फळ मिळतात. जेव्हाही ग्रहांचा हा परिणाम होतो तेव्हा आपल्याला काहीना काही संकेत मिळतात. यावर वेळीच उपाय केले तर अनेक संकटं टाळता येतात. चला तर जाणून घेऊयात की, जन्म कुंडलीत सूर्य नीच राशीत असेल तर त्याचा काय परिणाम होतो.
जन्म कुंडलीत सूर्याचा प्रभाव अशुभ होण्याचे पूर्व संकेत
जर तुमच्या कुंडलीत सूर्य अशुभ फळ देणार असेल तर तो सक्रिय होण्याआधी पूर्व घरात ऊर्जा देणाऱ्या वस्तू नष्ट होतील. किंवा ऊर्जेचा स्त्रोत बंद होईल. जसे की, बल्बचा फ्यूज जाणे, तांब्याची वस्तू हरवणे या प्रकारच्या गोष्टी घडत गेल्या की समजून जा की सूर्याचा अशुभ परिणाम पडतोय.
'हे' परिणाम मिळतात
- एखाद्या अधिकारी वर्गातील अधिकाऱ्याबरोबर तणाव जाणवणे.
- जर न्यायालायात एखादा वाद सुरु असेल तर त्यातून शुभ परिणाम प्राप्त होतील.
- शरीरात सतत सांधेदुखी जाणवणे.
- कोणत्या ना कोणत्या कारणाने जमीन सुकून जाते. किंवा येणारं पीक मुळासकट नष्ट होते.
- व्यक्तीच्या तोंडातून वारंवार थुंक येणे.
- वारंवार डोकं एखाद्या वास्तूशी आपटणे. यामुळे जखम देखील होऊ शकते.
- कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भर उन्हात चालावं लागू शकते किंवा उभं राहावं लागू शकते.
'हे' उपाय करा
- नियमितपणे सूर्य मंत्राचा जप करा.
- सूर्याला ताम्रपात्रातून अर्ध्य द्या.
- नियमितपणे गुळाचं सेवन करा.
- ताम्रपात्रातून रोज पाण्याचं सेवन करा.
- रविवारच्या दिवशी उपवास करा किंवा मिठाचं सेवन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 3 ऑक्टोबरला होणार शनीचा राहू नक्षत्रात प्रवेश; 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार, हवं ते कार्य होईल साध्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)