(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suresh Raina: सुरेश रैनाकडे आयपीएल फ्रॅंचाईझींची पाठ, लिलावात रैनावर बोलीच नाही ABP Majha
आयपीएलच्या मेगा लिलावात ईशान किशनसारख्या युवा आणि बहुगुणी शिलेदाराला सर्वाधिक सव्वा पंधरा कोटी रुपयांचा चढा भाव मिळाला. पण त्याच लिलावात सुरेश रैनाचा अनुभव आणि त्याची गुणवत्ता याकडे चेन्नई सुपर किंग्ससह दहाही फ्रँचाईझींनी पाठ फिरवली.यंदाच्या आयपीएल लिलावात रैनावर एकाही फ्रँचाईझीनं बोली लावली नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाच्या शर्यतीत रैना चौथ्या स्थानावर आहे. पण यंदा तो आयपीएलमध्ये तो खेळताना दिसणार नाही. रैनानं यंदाच्या आयपीएल लिलावाठी स्वत:साठी दोन कोटी रुपयांची मूळ किंमत ठरवली होती. पण पहिल्या फेरीत एकाही फ्रँचाईझीनं त्याच्यावर नावावर बोली लावली नाही. आणि त्यानंतरही रैनाला विकत घेण्यासाठी चेन्नईसह एकाही फ्रँचाईझीनं उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळं त्याचं नाव लिलावाच्या दुसऱ्या फेरीतही येऊ शकलं नाही. २०२० साली युएईत झालेल्या आयपीएलमधून रैना माघारी परतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी चेन्नईकडून खेळताना त्याला १७.७७च्या सरासरीनं केवळ १६० धावा करता आल्या होत्या.