
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule on Sachin Vaze : वसुली प्रकरणात जयंत पाटलांचं नाव, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Sachin Vaze : वसुली प्रकरणात जयंत पाटलांचं नाव, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. एवढच नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. देवेंद्र फडवणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर केले होते.
सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
