Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
EVM : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्यात आली.
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर (EVM Machine) आरोप केले जात आहेत. आता अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात (Pathardi-Shevgaon Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्यात आली. पाथर्डी तहसील कार्यालयासमोर रोहित पवार आणि प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. ईव्हीएम मशीन विरोधातील राज्यातील हे पहिलेच आंदोलन नगरमध्ये पार पडले असून महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात प्रताप ढाकणे, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदारांनी इच्छा व्यक्त केली होती. लोकांची भावना प्रताप ढाकणे यांच्या बाजूने होती, ते आमदार झाले पाहिजे ही जनतेची इच्छा होती. या मतदारसंघाचे वातावरण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने होते. लोकांनी ही निवडणुकीत हाती घेतली होती. प्रताप ढाकणे आमदार बनावे यासाठी जनतेने कष्ट घेतले होती. मात्र या मतदारसंघातील निकाल येथील जनतेला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आज येथील तहसील कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात ईव्हीएम मशीनची होळी केली. सामान्य लोकांना आता ईव्हीएमवर शंका वाटत आहे. ही शंका वाटणे लोकशाहीत योग्य नाही.
पाथर्डी-शेवगावमधून मोनिका राजळेंची हॅटट्रिक
दरम्यान, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रताप ढाकणे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी 19000 मतांनी विजय मिळवत हॅटट्रिक साधली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल