Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची ऐतिहासिक कामगिरी; तिसऱ्यांदा घेतली 'अवकाशभरारी'
Indian Origin Sunita Williams Created History: नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केली आहे. सुनीता विल्यम्स अंतराळातील चाचणी मोहिमेवर नवं अंतराळयान उडवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी 'बुच' विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं.
बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट (CFT) नावाचं मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाईटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यास, ते अंतराळवीरांना कक्षेतील प्रयोगशाळेत आणि तिथून नेण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचं स्टारलायनर हे दुसरं खाजगी अवकाशयान बनवेल.