Disha Salian case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन होणार, आजच आदेश निघण्याची शक्यता
Political Reaction On Disha Salian case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन होणार,
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियान (Disha Salian) आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची या प्रकरणी एसआयटीची (SIT) चौकशी करणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आलेल्या या बातमीनंतर राजकारण चांगलेच तापले. मात्र या मोठ्या बातमीनंतर आदित्य ठाकरे नेमकं कुठे अशी चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात नसून सध्या दुबईत आहे.
जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा देखील मृतयू झाला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. आता एसआयटी चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. आदित्या ठाकरेंना लवकरच अटक होणार असून अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाणार असल्याचा दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यानंतर आज एसआयटी चौकशी आणि आदित्य ठाकरे दुबईत यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.