Paraglider in Raj Thackeray rally : भाषणावेळी ड्रोन नव्हे, थेट पॅराग्लायडर आला, राज ठाकरे म्हणाले...
Paraglider in Raj Thackeray rally : भाषणावेळी ड्रोन नव्हे, थेट पॅराग्लायडर आला, राज ठाकरे म्हणाले...
राज्यात राजरोस अशा घटना घडत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे राज्यात कायद्याचा वचक उरलेला नाही. या सर्व प्रकरणात पोलिसांचा अजिबात दोष नाही. त्यांच्यावर जो वरच्या राज्यकर्त्यांचा दबाव असतो, त्या दबावामुळे त्यांना तसं वागावं लागतं. कारण पोलिसांनी कुठल्या गोष्टी करायला घेतल्या तर पोलिसांचं निलंबन होतं. पोलिसांमागे चौकशा आणि निलंबनाच्या कारवाई केली जाते. मात्र जे लोक सत्तेत बसले आहे त्यांच्या कधीही चौकशी केली जात नाही. कुठली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांच्या हातात आज काहीही नाही. मात्र दोष द्यायची वेळ आलीच तर त्यांना जबाबदार धरलं जातं.
अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे हे सहज बोलतात. मात्र, मी सहज कुठलीही गोष्ट बोलत नाही. आपण एकदा या राज ठाकरेच्या हातात या राज्याची सत्ता देऊन बघा. राज्य कसं हाताळलं जातं हे मी तुम्हाला दाखवून देईल, कायद्याची भीती काय असते, हे मी तुम्हाला दाखवून देईल आणि परत महिलांकडे बघण्याची कुणाची वक्रदृष्टी होणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केलाय.