एक्स्प्लोर
Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात आणखी एका आरोपीच्या घरावर हातोडा; राज्य सरकारची धडक कारवाई सत्र सुरुच!
Nagpur Violence : फहीम खानच्या घरावरील या कारवाईनंतर नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या युसुफ शेख याच्या घरावरही अशीच एक कारवाई करण्यात आली आहे.
Nagpur Violence
1/8

नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान (Faheem Khan) याचा घरावर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.
2/8

नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून प्रशासनही ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दुसून येत आहे.
3/8

या प्रकरणात आतापर्यंत फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेली, तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली.
4/8

नागपूर हिंसाचार प्रकरणात राज्यसरकारच्या बेधडक कारवाईला वेग प्राप्त झाला असून नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथक ही आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्रा आहे.
5/8

फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेलीय, तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली आहेत. संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले आहे. त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथे घर त्यावर पालिकेने हातोडा चालवला आहे.
6/8

युसूफ शेख घरात खाली पार्किंग मध्ये एक रुम अनधिकृत आहे सोबतच अधिकृत नकाशा व्यतिरिक्त पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बालकनीचे बांधकाम करण्यात आले होते, ते नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने तोडले आहे.
7/8

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या FIR मध्ये युसूफ शेख चे नाव हे 48 नंबर आहे तर फहीम खान मुख्य आरोपी पैकी एक आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या या बेधडक कारवाईत आता राज्यसरकारची धडक कारवाई सुरु असल्याचे चित्र आहे.
8/8

नागपूर हिसाचार प्रकरणात मोमीनपुरा भागात राहणाऱ्या शाहीन अमीन या आरोपीची हि दोन दुकाने आहे.
Published at : 24 Mar 2025 02:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















