(Source: ECI/ABP News/ABP Majha)
One minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha Live
One minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha Live
"सर्व देवस्थानांना मी प्रणाम करतो. जिंतूरवासियांना सांगायला आलोय. महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहायचा आहे का? 23 तारखेला आघाडीचा सुफडा साफ होणार आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनणार आहे", असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सांगायला आलोय. आघाडी सरकारने काय केलं याची लिस्ट घेऊन या. जिंतूरकरांनो दहा वर्षांपर्यंत शरद पवार केंद्रात मंत्री होते, सोनिया -मनमोहन यांचं सरकार होतं. 10 वर्षात महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार करोड रुपये मिळाले. मोदीजींनी 14 ते 24 मध्ये एक लाख 91 हजार करोडच्या समोर दहा लाख पंधरा हजार कोटी रुपये विकास निधी दिला.