Nanded : दूषित पाणी प्याल्याने मळमळ,उलटी,जुलाब, 300 हून अधिक जण रुग्णालयात
Nanded : दूषित पाणी प्याल्याने मळमळ,उलटी,जुलाब, 300 हून अधिक जण रुग्णालयात
नांदेड शहराजवळच्या नेरली या गावात शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली .. पिण्याच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले .. गावातील सार्वजानिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो .. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाली .. रात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर येणे असा त्रास होउ लागला. नंतर मात्र हा प्रकार वाढत गेला .. मोठया संख्येने रूग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्नाना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .. रात्रीतून शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली ...आज सकाळ पासुन देखील अनेकाना असाच त्रास झाला . त्यांची तपसनी करुन उपचार करण्यात आले ... गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे . आलेल्या रुग्णाची तपासणी करुन उपचार दीले जात आहेत .. जास्त त्रास असेलल्या रुग्नाना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जात आहे .. सार्वजानिक टाकीतील पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडल्याच डॉक्टरांनी सांगितले .. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे . सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असुन टाकीची सफाई सूरु केली जात आहे. ..