Konkan Railway : दरड कोसळल्याने कोकण रेल्वेला फटका; अनेक ट्रेन रद्द
Konkan Railway : दरड कोसळल्याने कोकण रेल्वेला फटका; अनेक ट्रेन रद्द कोकण घाटमाथ्यावर सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्याचा फटका आता कोकण रेल्वेलाही बसत असल्याचे दिसत आहे. (Kokan Railway update) कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस आणि दादर -सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिराने धावत आहेत. कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकण रेल्वेलाही फटका बसला आहे. मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेचा वेग मंदावला आहे. कोकणकन्यासह तुतारी एक्सप्रेसलाही उशीर मुंबईसह कोकण किनारपट्टी परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली असून कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मुंबई मडगाव सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस तर दादर सावंतवाडी जाणारी तुतारी एक्सप्रेस दोन तासाने उशीरा पोहोचणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. पावसामुळे कोकण रेल्वेचा प्रवास मंदावला सध्या मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे. मुंबई उपनगर आणि कल्याण मध्ये विविध भागात पाणी साठलंय. ज्यामुळे रेल्वे उशिराने चालतेय. सध्या मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाची जोरदार बँटिंग चालू आहे. आजदेखील (14 जुलै) रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच सातारा या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या चार जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेसला 6 तास उशीर मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस तब्बल ६ ते ७ तास उशिराने धावतेय. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहेत. मुंबईत पावसाची काय स्थिती? ताज्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.