(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Panchganga Water level : पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं
कृष्णा-पंचगंगा संगमावर असलेल्या नृसिंहवाडी मंदिरात रात्री पाणी शिरलेय. त्यामुळे भाविकांना आता दक्षिनद्वार सोहळा कधी संपन्न होतो याची प्रतीक्षा आहे. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर दर्शनानंतर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात स्नान करण्याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे भाविक हा दक्षिण द्वार सोहळा कधी पार पडतो याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी साधारण जुलै च्या पहिल्या आठवड्यातच दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला होता . मात्र यावेळी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे आतापर्यंत दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला नाही. दक्षिण द्वार सोहळा होण्यास अवघ्या काही फुटापर्यंत पाणी शिल्लक असून काही तासांमध्ये पाणी गाभार्यात शिरून दक्षिणदार सोहळा संपन्न होऊ शकतो. या मंदीरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. दक्षिणदार सोहळ्यानंतर स्नान करण्यासाठी भाविकांनी देखील मोठ्या संख्येने मंदिर परिसरामध्ये गर्दी केलेली आहे.