एक्स्प्लोर

आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी

आरपीआय (सचिन खरात गट) पक्षाचे नेते सचिन खरात यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत मोठी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी थेट राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. अद्याप मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवता न आल्याने नव्या सरकारची स्थापनाही झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) तसेच भाजपा (BJP) यांच्यात अद्याप मसाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे सरकार स्थापना लांबत चालली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अस असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मोठी मागणी केली आहे. 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन आहे. या दिवशी आंबेडकरी अनुयायी दु:खात बुडालेली असते. त्यामुळेच 5 डिसेंबर रोजीचा शपथविधी सोहळा पुढे ढकलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सचिन खरात यांनी नेमकी काय मागणी केली आहे?

6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या आदल्यादिवशी म्हणजे 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी खरात यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालेले आहे. आता विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागून सुद्धा आत्तापर्यंत महायुतीने सरकार स्थापन केलेले दिसत नाही, परंतु आता माध्यमातून असे समजत आहे की 5 डिसेंबरला महाराष्ट्र राज्य सरकारचा स्थापन होणार आहे. त्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 6 डिसेंबर रोजी संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबरच्या अगोदरच आंबेडकरी अनुयायी दुःखात बुडून गेलेले असतात. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम करू नये, अशी मागणी सचिन खरात यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

मंत्रिपदावरून चर्चा, म्हणून शपथविधी लांबला

येत्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात जागावाटपाची तसेच मुख्यमंत्रिपदाची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे काही महत्त्वाच्या मंत्रिपदांवर अडून बसलेले आहेत, असा दावा केला जातोय. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी लांबवणीवर पडतोय, असं सांगितलं जात आहे. 

Sachin Kharat News Video :

हेही वाचा : 

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?

Maharashtra Goverment: राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे ते धनंजय मुंडे, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला 'वर्षा'वर, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण; 50 दिवसांत काय झालं?Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget