(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Sanjay Gaikwad : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आणि भाजपच्या आमदाराने आपल्या विरोधकांना मदत केली असा आरोप शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
बुलढाणा : आपण एकट्यानेच लढलो, मित्रपक्षानेही आपल्याला मदत केली नाही. एवढंच काय तर आपल्या पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि आमदारांनीही आपल्या विरोधी उमेदवाराला मदत केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड यांच्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद आणि पक्षांमध्येही 'ऑल इज नॉट वेल' असल्याचं समोर आल आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे विधानसभा निवडणुकीत फक्त आठशे मतांच्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यामुळे अगदी काठावर पास झाल्याची भावना त्यांच्या जिव्हारी लागल्याचं समोर येत आहे. आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाण्यात एका कार्यक्रमात सत्कार झाला.
बुलढाण्यातील कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, निवडणुकीत मी एकटाच लढलो. माझ्यासोबत कुणीही नव्हतं. इतकंच काय तर मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही मला मदत केली नाही. जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मदत करणे तर सोडाच पण त्यांनी माझ्या विरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केलं होतं.
आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी आता थेट त्यांच्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यावर आरोप केला आहे. त्यामुळे यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल.
ही बातम्या वाचा: