Job majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?
Job majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?
भारतीय कंपन्यांमध्ये ऑनलाइन नोकरीच्या (Job) संख्येत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया ॲट वर्क 2024 च्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. लघु आणि मध्यम व्यवसायात डिजिटल वापरामुळं म्हणजे SMB क्षेत्रात आणि टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केल्यामुळं नोकरीच्या संख्येत वाढ झाली आहे.
BFSI, रिटेल, हेल्थकेअर मध्ये अधिक पोस्टिंग
अहवालानुसार, BFSI, रिटेल, हेल्थकेअर, IT-ES, शिक्षण आणि उत्पादन यासारखे प्रमुख उद्योग नोकरभरतीत आघाडीवर आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की HDFC एर्गो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टायटन सारख्या आघाडीच्या NIFTY 100 कंपन्यांनी देखील मुख्य भूमिकांसाठी भरतीसाठी Apna ला घेतले आहे. डिलिव्हरी आणि मोबिलिटी मधील Gig भूमिकांनी फूड एग्रीगेटर्स, वाहतूक आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून या जॉब पोस्टिंगपैकी 45 टक्के नॉन-मेट्रो क्षेत्रातून आले आहेत. जयपूर, लखनौ आणि इंदूर सारख्या शहरात देखील मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तर वाराणसी, रायपूर आणि डेहराडून सारख्या 3 शहरांमध्येही नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पुढच्या काळात देखील नोकरीच्या संधीत वाढ होणार आहे.