Milk Adultration : दुधातली भेसळ रोखण्यासाठी गोकुळचं पाऊलं, पॅकिंगमधील बदल थांबवणार भेसळ : ABP Majha
गेल्या काही महिन्यांमध्ये दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या आल्या आहेतय आता हीच भेसळ रोखण्यासाठी गोकुळनं पावलं उचलली आहेत. गोकुळला आता पाच थरांचं सुरक्षाकवच असणारे आहे. गोकुळचं दूध ग्राहकांपर्यंत अधिक सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी, भेसळ रोखण्यासाठी 'गोकुळ' दूध संघाचा उपाय 'गोकुळ'चं दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दुधात भेसळ करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर ते पॅकिंगवरून ग्राहकांना सहज लक्षात येईल. विशेष म्हणजे ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी 'गोकुळ'ने केलेल्या या नव्या पॅकींगमुळे दूधाच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही...चणार आहे. या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येईल.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
